मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक
हिमायतनगर-नांदेड दिनांक- 01 जुन 2022
“जे का रंजले गांजले। त्यासि म्हणे जो आपुले॥ तोचि साधु ओळखावा। देव तेथेंचि जाणावा॥’
तुकोबारायांच्या या अभंग पक्तींचा प्रत्यय आज आला. समाजातील अनेक माणसं प्रत्यक्ष कृतीमधून अमलात आणत आहेत. त्यात मा.आमदार नागेश पाटील आष्टीकर हेही कधीही, कुठेहि कमी पडत नसतात. त्यांनी अपघात ग्रस्तांचे प्राण आज वाचविले आहेत. समाजातील अशाच रंजल्या-गांजल्या लोकांना आपले मानून, त्यांच्यासाठी प्रसंगी देवाप्रमाणे धावणारे एक व्यक्ती म्हणजे मा. आमदार नागेश पाटील आष्टीकर साहेब त्यांनी हाती घेतलेल्या समाजकार्याचा वसा खऱ्या अर्थाने पार पाडत आहे. आज मा. आमदार नागेश पाटील आष्टीकर साहेब हे लग्न कार्यासाठी जात असतांना रस्त्यात अपघात झालेला पासुन, आष्टीकर साहेबानी कुठलाही क्षणांचा विलंब न लावता, न विचार करता गाडी थांबवली रुग्णास डोक्याला मार लागलेला होता. तो रुग्ण होता मरडगा येथील साहेबांनी प्रसंगावधान राखत आपल्या स्वतःची गाडी देऊन, तात्काळ डॉक्टराशी संपर्क साधला. आणि निवघा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतः सोबत जाऊन त्या अपघातग्रस्त रुग्णांस स्वतः अॅडमिट केले. खरंच एका अपघातग्रस्त रुग्णांचा जिव वाचला. मा. आमदार नागेश पाटील आष्टीकर साहेबांच्या या कार्याचे कौतुक सर्वत्र होत आहे.
“रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा” या तत्वावर चालणारे हदगाव हिमायतनगर संघातील एकमेव आमचा नेता म्हणजे नागेश पाटील आष्टीकर साहेब आहेत. अशी चर्चा हदगाव -हिमायतनगर तालुक्यातील सर्व शिवसेनीकांमध्ये ऐकावयास मिळत आहे.