खामगांव – स्थानिक घाटपुरी नाका परिसरातील आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातिल थोर महिलांच्या जीवनावर आधारित स्पीच तयार करुन आणलेले होते. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती, राष्ट्रमाता माँ जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तसेच विजयाबाई राजपूत यांच्या प्रतिमेला हार अर्पण करुन तसेच दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून जागतिक महिला दिन का सर्वांनी साजरा करावा आणि महिलांचे आपल्या घडण्यात आणि संस्कारी जिवनात असणारे अनन्य साधारण महत्व त्यांनी विषद केले. तसेच या कार्यक्रमात त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त एक नाटिका सुद्धा सादर केली.
या कार्यक्रमात विविध खेळात विजयी विद्यार्थ्यांना तसेच जिजामाता जयंती च्या दिवशी माँ जिजाऊ आणि बाल शिवाजी बनून आलेल्या महिला तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी ते करीता आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनिता पळसकर, जेष्ठ शिक्षिका सौ ममता महाजन, पर्यवेक्षिका सौ प्रियंका राजपूत, सौ ज्योती वैराळे, कु माधुरी उगले, सौ कल्पना कस्तुरे, सौ अलका वेरूळकर, सौ प्रिया देशमुख, सौ सारिका सरदेशमुख, कु दामिनी चोपडे, सौ अक्षरा इरतकर, सौ प्रियंका वाडेकर, सौ अर्चना लाहूडकर, कु मिनल लांजूडकर, सौ नम्रता देशमुख, श्रीमती स्वाती निंबोकार, सौ कोमल आकणकर, सौ अश्विनी वकटे, श्रीमती सपना हजारे, सौ संगीता पिवळटकर, सौ वंदना गावंडे, सौ सुवर्णा वडोदे, सौ प्रतिभा गावंडे, सौ राजकन्या वडोदे, सौ मीरा कांदिलकर आदींनी प्रयत्न केले.