इमारत बांधकाम कामगार संघटनेमार्फत माननीय कामगार आयुक्त जिल्हा सहकारी कामगारधिकारी आणि जिल्हाधिकारी माननीय मुख्य कार्यधिकारी यांना दिले निवेदन
संदिप देवचे 9860426674
… ग्रामसेवक ग्रामीण कामगारांचे खरे भक्षक
महाराष्ट्र इमारत कल्याणकारी मंडळाची स्थापना केली असून, त्यात इमारत बांधकाम व इतर कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या अंतर्गत कामगारांना वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहे. त्या कागदावरच असून त्याची पूर्तता होत नाही. राज्यातील 70% बांधकाम कामगार हे ग्रामीण भागातील आहे,
त्यांना जिवित पुरावा म्हणजे नूतनीकरण व नोंदणी करण्यासाठी लागणारे शासनाच्या नियमानुसार 90 दिवसाचे प्रमाणपत्र हे ग्रामसेवकाकडे देण्याचा अधिकार शासनाने दिला आहे. पण आज ग्रामसेवक हे प्रमाणपत्र देण्यास नकार देत आहे . प्रमाणपत्र मिळण्याकरिता व भ्रष्टाचार रोखण्यासाठी आम्ही संघटनेमार्फत वेळोवेळी माननीय कामगार आयुक्त, जिल्हा सहकारी कामगारधिकारी, आणि जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्याधिकारी सर्वांनाच निवेदन दिले
तरीपण ग्रामसेवक प्रमाणपत्र देण्यास नकार देतात .म्हणतात आम्हाला प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही. अशी कुठली तरतूद नाही असा कोणता शासनाने परिपत्रक काढले आहे? फक्त आणि फक्त हे ग्रामसेवक यांनी चालवलेली मोहीम आहे. मग आमचा कामगारांचा शासनास असा प्रश्न आहे कि तुम्ही योजना राबू शकता एखादा शासकीय अधिकारी याची खरी खोटी शहानिशा करण्यासाठी येत का नाही?
ग्रामसेवकाला आदेश देण्याचा अधिकार शासनाला नाही आहे का? आज सर्वच ग्रामीण भागातील कामगार या ग्रामसेवकाच्या निर्णयाच्या विरोधात पेटुन उठतील त्याचा जर राग अनावर झाला तर तो काहीही करू शकतो. तो त्या त्रासाला कंटाळून स्वतः जीवितहानी करू शकतो! तर त्याच्या हातून काही गुन्हा घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील. तरी शासनाने शक्य तेवढ्या लवकर याचा निर्णय घ्यावा.
कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक प्रश्न त्यांच्या मुलांच्या विवाहाचे प्रश्न तर त्यांच्या या तर त्याची प्रश्न अशा प्रकारचे असून हा प्रश्न फक्त ग्रामसेवकांच्या प्रमाणपत्र देण्याच्या नकारामुळ रखडीत राहिलेला आहे .तरी शासनाने या सर्व प्रश्नावर लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर कामगारांना न्याय देण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा सर्व कामगार तीव्र स्वरूपाचे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नितीन सूर्यभान वाकोडे महाराष्ट्र राज्य संघटक बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर संघटित मजूर संघ व महाराष्ट्र राज्यस्वातंत्र स्वातंत्र बांधकाम कामगार कृती समिती महाराष्ट्र बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी गणेश मोरे, जिल्हा सचिव ईश्वर चराटे देत आहे