हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्युज मो. नंबर – 8983319070
नाशिक – बदलत्या काळानुसार शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसायाकडे तरुणांनी वाटचाल करावी त्यातून आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे भटके विमुक्त आघाडीचे महानगर संयोजक तथा धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री सिद्धेश्वर उर्फ बापू शिंदे यांनी केले.
बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने गंगापूर येथील आरटीसी सेंटर येथे शेळी पालन व्यवसाय संदर्भात शेतकरी बांधव व युवकांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
त्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित श्री. बापू शिंदे बोलत होते.
उच्च शिक्षण घेऊन देखील अनेक युवक युवती नोकरी पासून वंचित आहेत, युवकांनी स्वयंरोजगाराकडे वाटचाल करून कौटुंबिक जबाबदारी पार पाडावी. शेळीपालन व्यवसाय देखील अधिक उत्पन्न देणारा किफायतशीर आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना शेळीपालन व्यवसायासाठी असून त्यात अनुदान देखील दिले जाते. महामंडळाच्या माध्यमातून युवकांच्या आर्थिक उन्नतीसाठी असलेल्या योजना मिळवून देण्यासाठी बँका देखील वित्तपुरवठा करीत असतात.त्याचा फायदा घेतला पाहिजे.
शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी यावेळी त्यांनी दिले.
या कार्यक्रमास आसिटी सेंटर चे समन्वयक राजेंद्र जाधव, तसेच पशुसंवर्धन विभागांचे अधिकारी, बॅकेंचे अधिकारीसह शेतकरी बांधव व युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( शब्दांकन श्री. निलेश बाविस्कर पत्रकार नाशिक