नांदेड येथे सावता परिषदेकडुन स्वागत
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड प्रतिनिधी दिनांक- 28 जानेवारी 2024
सावता परिषद माळी समाजाचे राज्यव्यापी सक्रिय संघटन आहे. माळी समाजात राजकीय आणि शैक्षणिक जागृती साठी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी पुढाकार घेतला आहे.माझ्या राजकीय प्रवासात सावता परिषदेने मोलाची साथ दिल्याचे प्रतिपादन ओबीसी बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुल सावे यांनी व्यक्त केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण ना.अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. नांदेड नगरीत आगमन झाल्यानंतर सावता परिषदेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.याप्रसंगी भावना व्यक्त करतांना ना.अतुल सावे म्हणाले की,सावता परिषद ही लढवय्ये संघटना आहे.माळी समाजाच्या प्रश्नांना आवाज उठविण्याचे काम सातत्याने या संघटनेच्या माध्यमातून होत आहे.माझ्या राजकीय प्रवासात सावता परिषदेने खंबीर साथ दिली असल्याचे प्रतिपादन ना.सावे यांनी केले.
स्वागतप्रसंगी नांदेड जिल्हाध्यक्ष गोरखनाथ राऊत , जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिंदे , जिल्हा सरचिटणीस संदीप राऊत, जिल्हा प्रवक्ते मारोती शीतळे , युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत राऊत, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर गोरे, युवा महानगराध्यक्ष संदीप झांबरे, महानगर सरचिटणीस कैलास शिंदे ,अर्धापूर तालुकाध्यक्ष लवराज माटे, माळी समाज बांधव, विविध संघटनेचे पदाधिकारी मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.