“माझे आरोग्य माझा हक्क”
अंगद सुरोशे प्रतिनिधी हिमायतनगर
हदगाव-हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी निवघा बाजार येथे हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मोफत सर्व रोग निदान उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजक आमदार बाबुराव कदम कोहळीकर हे होते
माझे आरोग्य माझा हक्क या घोषवाक्यास अनुसरून महाराष्ट्र शासन विविध आरोग्य विषयक योजनांच्या द्वारे राज्यातील सर्व नागरिकांना सुदृढ आरोग्याचा हक्क प्रदान करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
शासनाच्या या उदात्त हेतुस प्रत्यक्ष कृतीतून सत्यात उतरविण्याचा नेहमीच माझा प्रयत्न राहिला आहे. ….. याच जाणिवेतून मी गतवर्षी २०२३मध्ये हदगाव,हिमायतनगर आणि तामसा या तीन ठिकाणी यशस्वीरित्या आरोग्य शिबिराचे आयोजन करून मतदारसंघ तसेच बाहेरील ही शेकडो नागरिकांना पुढील शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. हिच परंपरा पुढे चालू ठेवत आज दि. २५/०१/२०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथरावजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दत्ता मेघे उच्च शिक्षण संस्था संचलीत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालय, सावंगी(वर्धा) यांच्या सहकार्याने निवघा बा.(ता.हदगाव) येथे मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबीर पार पडले. या शिबिराचा हजारो गरजू रूग्णांनी लाभ घेतला. या शिबिरात अनेक रुग्णांची मोफत तपासणी झाली. ज्या रूग्णांना पुढील शस्त्रक्रिया किंवा अन्य तपासणी गरजेची आहे, अशा हजारो रुग्णांना, दत्ता मेघे रुग्णालय , सावंगी (वर्धा) येथे पुढील मोफत उपचार व शस्त्रक्रिया करिता पाठविण्यात येणार आहे. याप्रसंगी नागरिकांनी दाखविलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्या बद्दल सर्वांचे आमदार महोदयांनी आभार मानले आहे