स्व.बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त आ. बाबुराव कदम यांचा स्तुत्य उपक्रम…
अंगद सुरोशे
हिमायतनगर प्रतिनिधी/- हदगांव हिमायतनगरचे कार्यसम्राट आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे दि २५ जानेवारी रोजी गंगाराम पाटील हायस्कूल निवघा बाजार येथे आयोजित केले आहे या आरोग्य शिबिराचा मतदार संघातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्याकडून करण्यात आले आहे….
याबाबत सविस्तर वृत्त असे की दि 23 जानेवारी रोजी हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून त्यानिमित्त दि 25 जानेवारी रोजी हदगाव हिमायतनगर या दोन्ही तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्यासाठी मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रुग्णांची नोंदणी व तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची निःशुल्क तपासणी केली जाणार आहे. या शिवाय भरती केलेल्या रुग्णांना खाट शुल्क माफ असून जेवण मोफत देण्याची तरतूद आहे भरती रुग्णांना सर्व सामान्य चाचण्या एक्स-रे, रक्त, चाचणी, सोनोग्राफी मोफत करण्यात येणार आहे. महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी केली जाईल.उच्च रक्तदाब शुगर, जुनाट ताप, किडनीचे आजार, हृदयरोग, डोळ्यांचे आजार,अशा अतिविशिष्ट चाचण्या जसे की सि.टी. स्कॅन, एम. आर. आय. आदी चाचण्या आवश्यकते नुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत करण्यात येतील. डॉक्टरांच्या सल्यानुसार इ. सी. जी. तपासणी मोफत केली जाईल अशा विविध आजारावरील शस्त्रक्रिया या शिबिरात मोफत करण्यात येणार आहेत त्यामुळे हादगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान हदगाव हिमायतनगर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले आहे…