पाणी पुरवठा आढावा बैठकीत ग्रामसेवकांची बोलती बंद अनेक ग्रामपंचायतीचे पितळ उघडे ….
अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी
तहसील कार्यालयासमोरील प्रांगणात दिं.१३ जानेवारी आमदार मा.बाबुराव कदम कोहळीकर यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा व जनता दरबार संपन्न झाला आहे.या वेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरुन आमदार कोहळीकर बोलत असताना, विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या विविध समस्या या तातडीने सोडवण्यासाठी तालुकास्तरीय प्रशासनाने सहकार्य करावे.जनतेला चांगल्या सोईसुविधा उपलब्ध करून देणे आपले पहिले कर्तव्य आहे.हे अधिकारी-कर्मचारी बांधवांनी विसरु नये,असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ग्रामीण पाणी पुरवठा नियोजन कृती आराखडा बैठकीत मात्र तक्रारींचा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता.मौजे एकंबा गावात विविध विकासकामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार प्रकरणी चर्चेत आले होते.तर गावकऱ्यांनी अगदी आक्रमकपणे झालेल्या गैरव्यवहारा विषयी आपली बाजु मांडुन दोषींवर कारवाईची मागणी केली होती.तसेच अनेक गावांच्या ग्रामस्थांनी आमदाराकडे मुलभूत सुविधांचा तक्रारीचा पाढा वाचला आहे.
आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई करीता उपाययोजना तातडीने आखुन सरपंच व ग्रामसेवकांनी समन्वयाने कामे करावी.तर पाणीटंचाई निवारणाचे कामेसुद्धा वेळेवर करावे अश्या सुचना आमदार कोहळीकर यांनी तालुका प्रशासनाला केल्या आहेत.तसेच ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा संभाव्य कृती आराखडा सन २०२५ तयार करण्यात आला आहे.तालुक्यातील एकुण ५२ ग्रामपंचायतींच्या पाणीटंचाईचा आढावा आमदार महोदयाकडून घेतला गेला आहे.त्यानंतर अनेक समस्या गावकऱ्यांनी मांडल्याआहेत.त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन आमदार यांनी दिले आहे.
बैठकीचे प्रास्ताविक सहाय्यक गटविकास अधिकारी प्रल्हाद जाधव यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणुन शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख,जि.पचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर, अनिल पाटील बाभळीकर,माजी सभापती बालासाहेब कदम,उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे,बबनराव कदम,युवा सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसनीकर,सुदर्शन पाटील मनुलेकर, संजय गांधी निराधार समिती तालुकाध्यक्ष विजय वळसे, तहसीलदार सौ.पल्लवी टेमकर, संभाराव लांडगे,रामभाऊ ठाकरे विकास पाटील,राजु पाटील भोयर,गजानन तुप्तेवार,भाजप तालुकाध्यक्ष गजानन चायल,आशिष सकवान,सत्यवृत ढोले, बालाजी राठोड,सरपंच परमेश्वर गोपतवाड, पत्रकार दत्ताभाऊ शिराणे,कैलास राठोड,सौ.शीतल भांगे, युवा नेते दिनेश राठोड,बाळाजी करेवाड,गौरव सुर्यवंशी,गणेश शिंदे, प्रभाकर अण्णा मुधोळकर,लक्ष्मण जाधव, माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद अ.गण्णी,ज्ञानेश्वर पुठ्ठेवाड,सुनील चव्हाण,यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी,ग्रामविकास अधिकारी,ग्रामसेवक,तलाठी,मंडळाधिकारी विविध सामाजिक,राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांची तसेच पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.