हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर – 8983319070
गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट तर्फे गेले अडीच वर्षापासून नाशिक मध्ये गोदावरी स्वच्छतेचे कार्य सुरू केले असून येता रविवार हा प्रतिष्ठानचा गोदा स्वच्छतेचा १४० वा सप्ताह असेल असे प्रतिष्ठानच्या नाशिक अध्यक्ष श्री दीपक पाटील सांगितले. या निमित्ताने संस्थेचे जवळपास ७२ सदस्य आणि स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन स्वच्छता अभियान राबविले जाते आणि प्रभात फेरी काढून जनजागृती केली जाते.
ट्रस्टच्या कार्यकारी मंडळाने यासंदर्भात नुकतीच नवनियुक्त आयुक्त खत्री मॅडमची भेट घेतली आणि त्यांना कामाची माहिती दिली.
गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट सारख्या अजूनही काही संस्था या कार्यात आहेत. सगळ्यांना एकत्र घेऊन एक जन अभियान उभ करून नाशिकची गोदावरी नदी पूर्वीसारखीच स्वच्छ निर्मळ करण्याचा त्यांचा एक छोटासा प्रयत्न आहे.
यासारख्या ज्या विविध संस्था ‘गोदा स्वच्छता’ या एकमेव उद्देशाने काम करतात त्यांनी आणि प्रशासनाने एक दुसऱ्याला मदत केली तर नक्कीच आपण आपली गोदावरी नदी स्वच्छ सुंदर आणि वाहती करू शकू अशी खात्री प्रतिष्ठानच्या नाशिक अध्यक्षांनी व्यक्त केली.
गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री अजिनाथ जी ढाकणे यांनी ट्रस्टच्या नाशिक शाखेचे त्यांच्या कामाबद्दल कौतुक केले आहे.