Home Breaking News पाचशिव( पार्शवनाथ) महादेव यात्रेत हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ.

पाचशिव( पार्शवनाथ) महादेव यात्रेत हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक, नांदेड दिनांक- 06 डिसेंबर 2024

हिमायतनगर तालुक्यातील पाचशिव महादेव (पार्शवनाथ) संस्थान महादेव फाटा सवना ज., जिरोणा, महादापुर, दगडवाडी, चाचोर्डी, रमणवाडी, वाशी, एकघरी, गणेशवाडी, गणेशवाडी तांडा आदी गावच्या भाविक भक्तांच्या सहकार्यातुन गेल्या अनेक वर्षापासुन यात्रा भरत आहे. दिवसेंदिवस या यात्रेला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे. आज सहा जानेवारी रोजी सकाळी महादेवाचा महाभिषेक, आरती करुन दुपारी एक वाजता महिला, पुरुष, लहान मुलं,मुली आदी हजारो भावीकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.

संगित भजनी मंडळ एकघरी आणी भिसी येथील संगीत संचाने विविध प्रकारचे गिते गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांनी त्यांच्या कलेला बक्षिस देऊन दाद दिली आहे.

*शालेय लेझीम स्पर्धेला सुरुवात*

पाचशिव महादेव ( पार्शवनाथ) यात्रेत लेझीम स्पर्धेचे उद्घाटन हिमायतनगर येथील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मेकालेसर यांच्या हस्ते श्रीफळ फोडुन केले आहे. शालेय विदयार्थी, विदयार्थींनी एकुण पाच लेझीम संघांनी भाग घेतला होता. त्यामध्ये कालवश चांदराव राऊत शासकीय आश्रम शाळा मादापुर, जिल्हा परिषद शाळा भिसी, जिल्हा परीषद शाळा बोरगडी, गुरुकुल ईग्लींश स्कुल हिमायतनगर, जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमीक शाळा सवना ज. या पाच संघानी लेझीम स्पर्धेत भाग घेतला होता. सर्व लेझीम स्पर्धकांनी अतिशय उत्कृष्ट वेगवेगळे प्रकारांचे सादरीकरण करुन, प्रक्षेकांच्या डोळ्यांची पारणे फिटली आहेत.

Previous articleबॅंकेतुन शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड करीता फोन करुन आज्ञात व्यक्तीने खाता क्रमांक विचारुन खात्यातील 85 हजार गायब केले
Next articleभगवान श्री.घोडेगिरी बिरदेव महाराजांच्या पालखी परिक्रम सोहळा रामकुंड परिसरात धनगर समाज जेष्ठ नेते बापूसाहेब शिंदे यांच्यासह मान्यवरांनी केली जागेची पाहणी…