Home Breaking News हिमायतनगर श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्रि निमित्त यात्रा नियोजन बैठक संपन्न ….

हिमायतनगर श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्रि निमित्त यात्रा नियोजन बैठक संपन्न ….

यात्रा कमेटीच्या अध्यक्षपदी सुभाष शिंदे उपाध्यक्षपदी विट्ठलराव चव्हाण यांची निवड….

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी 

सर्वदूर प्रसिद्ध आसलेल्या हिमायतनगर (वाढोणा वारणावती) श्री क्षेत्र परमेश्वर देवस्थान च्या २०२५ या वर्षातील यात्रे निमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तरी या यात्रा कमेटीच्या अध्यक्षपदी सुभाष शिंदे उपाध्यक्षपदी विट्ठलराव चव्हाण यांची सर्वानुमते देवस्थान कमेटीच्या अध्यक्षा तथा तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितित निवड करण्यात आली .

सबंध भारतात श्री परमेश्वरा ची उभी मुर्ती ही एकमेव नांदेड जिल्ह्यातील वाढोणा नगरीत आसल्याने येथील यात्रेला मोठ्या प्रमाणात भावीकांची गर्दी होत आसते विदर्भ मराठवाडा तेलंगणा आंध्रप्रदेश सह अनेक राज्यातुन भावीक या वारणावती नगरीत येतात या यात्रा काळात कोणतीही आडचण भासणार नाही यासाठी विविध कार्यक्रम व त्या साठी लागणारी कमेटी नेमल्या जाते यामध्ये परमेश्वर संस्थान कमेटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ , सेक्रेटरी अनंत देवकते ,संचालक प्रकाश शिंदे ,वामनराव बनसोडे, राजाराम झरेवाड,अॅ.दिलीप राठोड, मथुराबाई भोयर, अनिल मादसवार ,संजय माने, विलास वानखेडे ,गजानन मुत्तलवाड, लिपीक बाबुराव भोयर ,पोलीस निरीक्षक अमोल भगत, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड,विकास पाटिल संतोष गाजेवार ,माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे यांची उपस्थित होती महाशिवरात्रि यात्रा महोत्सव दि.२४फेब्रुवारीपासुन सुरु होणार आहे १२मार्च ला यात्रेचा सत्कार समारोह करून सांगता होणार आहे या परमेश्वर देवस्थान च्या यात्रा महोत्सवाचा भावीकांनी लाभ घ्यावा आसे आवाहन यात्रा कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे

Previous articleसावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त सावता परिषदेच्या वतीने अभिवादन..
Next articleसावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त कृषी विभाग बाळापुर यांच्याकडुन अभिवादन ..