सावित्रीबाई फुले मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक. नांदेड
दिनां- 03 डिसेंबर 2024
भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज, ३ जानेवारी जयंतीदिन. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाईंना त्यांच्या १९४ व्या जयंती निमित्त सावता परिषद या सामजिक संघटनेच्या वतीने आय टी आय येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विविध सामाजिक संघटना समाज बांधव ज्येष्ठ नागरिक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.