Home Breaking News नाशिक मधील प्रसिद्ध अहिल्याराम मंदिराच्या चरणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सवाची निमंत्रण पत्रिका...

नाशिक मधील प्रसिद्ध अहिल्याराम मंदिराच्या चरणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सवाची निमंत्रण पत्रिका अर्पण

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा

22 मे रविवार रोजी नाशिक येथील पंचवटी मधील रामकुंडा जवळील अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या अहिल्याराम मंदिरातील श्रीरामप्रभुना व मंदिरात असलेल्या अहिल्यादेवी च्या मुर्तीला 31मे रोजी होणाऱ्या अहिल्या जन्मोत्सवाची पत्रिका अर्पण करण्यात येऊन पुजा करुन जन्मोत्सव यशस्वी होण्यासाठी आशिर्वाद घेण्यात आले.

या प्रसंगी अहिल्याराम मंदिराचे पुजारी वैभव क्षमकल्याणी यांनी अहिल्याराम मंदिराचा व त्याच बरोबर अहिल्या देवीणीच बांधलेल्या भारतातील एकमेव नंदीच्या नावा वरून असलेल्या गोरानंदी महादेव मंदिराचा इतिहास सांगुन अहिल्या देवीनी देशभर केलेल्या धार्मिक कामाची महती गाऊन सर्व हिंदू बांधवाना व भगीनींना अहिल्या जन्मोत्सवात मोठ्या संख्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी जन्मोत्सव सोहळाचे प्रमुख आयोजक दिगंबरभाऊ मोगरे व समाधानभाऊ बागल उपस्थित होते. आयोजकाच्या वतीने समाधान बागल यांनी होणाऱ्या संपूर्ण सोहळयाची माहिती उपस्थित असणाऱ्या होळ कर प्रेमीना दिली.
या प्रसंगी संयोजन समितीतील सदस्य आण्णासाहेब सापनर, शामराव महाजन, हेमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे, वैभव रोकडे, श्याम गोसावी, भूषण जाधव, विजय चितळकर, भूषण जाधव, संकेत शिंदे, श्री. राहुल बागल आदी. सह अनेक समाजबांधव उपस्थित होते.

Previous articleगोठ्याला आग लागून शेतकऱ्यांचे दोन लाखांवर नुकसान
Next articleमहाकावी वामनदादा कर्डक यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने राष्ट्रीय गुणगौरव सोहळा व निमंत्रितांचे कविसंमेलन