Home Breaking News महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सोशल मीडिया जिल्हा संयोजकाचा केला सन्मान…..

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सोशल मीडिया जिल्हा संयोजकाचा केला सन्मान…..

विधानसभेमध्ये चांगले काम केल्याबद्दल भाजपा मंत्र्यांकडून नागेश शिंदे यांचे विशेष कौतुक….

अंगद सुरोशे

हिमायतनगर प्रतिनिधी/- विधानसभा 2024 निवडणूक काळात नांदेड जिल्ह्या सह सर्व महाराष्ट्रातील विधानसभे मध्ये सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी जे समर्पण भावनेने केलेले कष्ट व अथक परिश्रमा बदल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सोशल मीडिया जिल्हा संयोजकांची दि 19 डिसेंबर रोजी CP क्लब, नागपूर येथे विशेष बैठक घेऊन सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी सोशल मीडिया जिल्हा संयोजक नांदेड उत्तर चे नागेश शिंदे यांचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विशेष सत्कार करून त्यांचे कौतुक केले…..

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी कडून फेक निगेटिव्ह पसरवून मतदारांची दिशाभूल करत जो फटका महायुतीला बसला होता याचे सूक्ष्म निरीक्षण करून मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया व आयटी सेलने संपूर्ण महाराष्ट्रभर विधानसभा वाईज उनिवा लक्ष्यात घेऊन वेळोवेळी प्रदेश कार्यालयाकडून आलेल्या सूचनांचे पालन केल्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात नेत्र दीपक यश मिळाले त्याबद्दल नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिनांक 19 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील सोशल मीडिया व आयटी सेलच्या जिल्हा संयोजकाची एक बैठक सीपी क्लब नागपूर येथे आयोजित केली होती त्या बैठकीत मराठवाडा संयोजक साईनाथ शिरपुरे, व नांदेड जिल्हा संयोजक नागेश शिंदे, अक्षय आमीकंठवार, नांदेड महानगर संयोजक उमेश सरोदे यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांचा सन्मान केला त्यानंतर लगेच महाराष्ट्रामधील सर्व नवनिर्वाचित मंत्री व आमदारा सोबत स्नेह भोजन करून नवनिर्वाचित मंत्र्यांनि सोशल मीडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या….

Previous articleआमदार बाबुराव कदम कोहळीकरांनी शेतक-यांची भक्कमपणे बाजु विधानसभेत मांडली.
Next articleसावता परिषद नांदेड महीला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी प्राचार्य डॉ .सौ योगिनीताई लक्ष्मण शिंदे यांची निवड