Home Breaking News आमदार बाबुराव कदम कोहळीकरांनी शेतक-यांची भक्कमपणे बाजु विधानसभेत मांडली.

आमदार बाबुराव कदम कोहळीकरांनी शेतक-यांची भक्कमपणे बाजु विधानसभेत मांडली.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 19 डिसेंबर 2024

 

नागपुर येथे सध्या हिवाळी अधिवेशन विधानभवनात चालु आहे. हदगांव-हिमायतनगरचे विध्यमान आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी शेतक-यांच्या पारंपारीक पिकाविषयी भक्कमपणे बाजु मांडली त्यांनी ते म्हणाले कापुस बिटी -2 वाण हे दिवसेंदिवस कमी पिकत आहे. कापुस बिटी -7 हे अधिक उत्पन्न देणारे वाण बाजारात आणावे. अशी विनंती त्यांनी अध्यक्ष महोदयांना केली आहे. त्याचबरोबर हरभरा हे पिक सतत शेतकरी पेरणी करीत असल्याने जमिनीमध्ये बुरशीचे प्रमाण वाढत असुन जमिनी नापिक होत आहेत.

पिक विमा कंपनीने शेतक-यांना अल्प 25% टक्के पिक विमा देत आहेत. त्यामुळे शेतक-यांचे नुकसान होत आहे. त्यामध्ये बदल करुन 50% टक्के देण्याची विनंती अध्यक्षांकडे केली आहे.

आपल्या पहिल्याच अधिवेशनात शेतक-यांविषयी महाराष्ट्रातील आमदार बाबुराव कदम कोहळीकर हे पहिलेच लोकप्रतिनिधी आहेत. हदगांव-हिमायतनगर तालुक्यातील शेतक-यांच्या प्रश्नांची भुमीका नागपुर हिवाळी अधिवेशनात मांडल्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतक-यांनी आमदार कदम साहेबांचे कौतुक केले आहे.

Previous articleमहावितरण कंपणी चा भोंगळ कारभार 
Next articleमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सोशल मीडिया जिल्हा संयोजकाचा केला सन्मान…..