शासकीय कर्मचारी चढवतात कंत्राटी कामगार पोल वर अपघात झाल्यास जबाबदार कोण..?
ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674
…..जलंब येथे महावितरण विज वितरण कंपणी चा कारभार हा दिवसांन दिवस भोंगळ होत चाललेला आहे कर्मचार्यांनी काम करणे बंध करून कंत्राटी कामगार ठेवले आहेत शासकीय पोल वर हे कामगार चढुन बिनधास्त काम करतात काही अपघात झाल्यास जबाबदार कोण कर्मचारी मात्र शासनाचा भरघोस पगार घेऊन झोपा काढतात महावितरण कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्या मुळे रात्री ची लाईन गेल्यास कर्मचारी फोन उचलत नाही उचल्यास कंत्राटी कामगारांना बोलवा असे सांगतात ते कामगार ग्राहका सोबत अरेरावीची भाषा वापरतात व अतिरिक्त पैसे घेऊन काम करतात येवढा अधिकार यांना दिला कोणी त्याची जिवीत हाणी झाल्यास जबाबदार कोण…हा प्रश्न मात्र ग्राहकांना पडतो…