Home Breaking News आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे स्वप्न झाले साकार!

आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे स्वप्न झाले साकार!

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 17 डिसेंबर 2024

आम्ही वारकरी सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने दिनांक 16 डिसेंबर 2024 सोमवार रोजी पंढरपूर येथे श्री सुभाष मोतीचंद शहा यांच्याकडील पंढरपूर नगरपालिका क्षेत्रातील एन. ए. झालेला

2000 स्केवर फूटचा प्लॉट धर्मशाळा बांधण्यासाठी

आज खरेदी करण्यात आला.या जागेची पाहणी व कागदपत्र तपासणीसाठी श्री नारायण जोशी साहेब,श्री भास्कर अण्णा रेडी, श्री गंगाराम पांगरेकर, श्री उत्तमराव बोपेवार सर,राहुल महाडिक,नितीन कौलवार यांचे मार्गदर्शन लाभले. आजच्या रजिस्ट्रीसाठी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राम महाराज पांगरेकर,संस्थापक सचिव व्यंकट महाराज जाधव माळकौठेकर, कोषाध्यक्ष शिवाजी मदमवाड व संस्थेचे सर्व संस्थापक सदस्य यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर संस्थेला ज्यांचं नेहमी मार्गदर्शन लाभत असे आमचे रावसाहेब पा.शिराळे ,रामजी पा.,दत्तराम गोरठेकर तसेच संस्थेचे सल्लागार गंगाधर पा. भरकडे,शिवाजी पांगरेकर महिला आघाडीच्या माता भगिनीं, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख श्री चंपतराव डाकोरे तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleहिमायतनगर बाजार समितीवर एकहात्ती सत्ता असुन सुध्दा शेतक-यांचा मालाचा लिलाव होत नाही.