Home Breaking News खामगाव येथे कुणबी समाज उपवर युवक युवती परिचय मेळावा 

खामगाव येथे कुणबी समाज उपवर युवक युवती परिचय मेळावा 

…..समाज बांधवांनी मोठ्या संखेणे उपस्थिति राहावे जलंब चे माजी सरपंच तथा खामगाव कुणबी समाज पंच मंडळाचे संचालक दिलीप शेजोळे यांचे आवाहन..

ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674

येत्या रविवार दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी कुणबी समाज युवक युवती परिचय मेळावा व सोयरीक पुस्तिकेचे प्रकाशन समारंभ होत आहे संत शिरोमणी तुकाराम महाराज सभागृह नांदुरा रोड, खामगांव जि. बुलडाणा

वेळ : सकाळी ११ वाजता राहील तरी समाज बांधवांनी मोठ्या संखेणे उपस्थिति राहावे असे आवाहण जलंब चे माजी सरपंच दिलीप भाऊ शेजोळे यांनी केले आहे या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिति श्री.ह.भ.प गुरूवर्य स्वामी रामभारतीजी महाराज सन्यास आश्रम चांगेफळ. जळगांव मतदार संघाचे आमदार माजी मंत्री सजंयजी कुटे खामगाव मतदार संघाचे आमदार आकाशदादा फुंडकर चिखली मतदार संघाचे आमदार स्वेताताई महाले नांदुरा मतदार संघाचे माजी आमदार राजेशजी ऐकडे बाळापुर मतदार संघाचे माजी आमदार नारायनराव गव्हानकर यांची प्रमुख उपस्थिति राहणार आहे

• कार्यक्रमाची रुपरेषा

सकाळी ११ वा. दिप प्रज्वलन

सकाळी ११.१५ : मान्यवरांचा सत्कार

सकाळी ११.३० : प्रास्ताविक व वधू वर परिचय

दुपारी १२.४५ : सोयरीक पुस्तिकेचे प्रकाशन

दुपारी १.१५ : मान्यवरांचे मनोगत राहील व स्नेहभोज

दुपारी १.०० ते ४.०० राहील

सोयरीक पुस्तिकेसाठी सहकार्य करणाऱ्या समाज बांधवांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात येईल…

Previous articleदिव्यांग शासकीय निमशासकीय कर्मचारी आधिकारी संघटना आझाद मैदान येथे महावितरण मधील अन्याय विरोधात आमरण उपोषण.
Next articleमहाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत खोदलेल्या सिंचन विहिरीचे अनुदान आठ दिवसांत मिळणार.