Home Breaking News कपिला नदी व नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाह अडवल्याने संभाजी नगर रोडला तलावाचे स्वरूप.

कपिला नदी व नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाह अडवल्याने संभाजी नगर रोडला तलावाचे स्वरूप.

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज
मो. नंबर – 8983319017

के.के.वाघ शेतकी महाविद्यालय अमृतधाम ते कपालेश्वर नगर संभाजी नगर रोड झालेले नवीन बांधकाम व त्यास दिलेल्या नियोजन शून्य परवानग्या तसेच छोटे टपरी धारक रोड लगत असणारे व्यावसायिक यांनी नैसर्गिक नाले तसेच जागे समोरील प्रवाह बुजवल्याने संभाजीनगर रोड वर असलेल्या गाडगे महाराज कुष्ठ धाम, कपालेश्वर नगर, सेवा सोसायटी, मोरे फार्म,कैलास नगर, निलगिरी बाग रोड व मोकळ्या जागेत अक्षरश तलावाचे स्वरूप प्राप्त होवून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना व नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.अवकाळी पावसामुळे जर इतकी दुरावस्था होत असेल तर पावसाळ्यात येथून जाणे ही अवघड होणार.प्रशासनाने रोड लगत असलेल्या नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह तत्काळ मोकळे करावे अतिक्रमण काढण्यात येवून ज्यांनी नदी व नाल्यांचा भराव टाकून प्रवाह अडवला त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशी यांनी केली आहे.

 

Previous articleजगायचं कशासाठी ?
Next articleहिमायतनगर ते बोरगडी रोड चे काम निष्कृष्ट आसल्याची बांधकाम विभागाकडे तक्रार…..