Home Breaking News जगायचं कशासाठी ?

जगायचं कशासाठी ?

👉 चिंतन

मारोती अक्कलवाड. पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 04 डिसेंबर 2024

 

माणूस जन्माला येतो लहानाचा मोठा होतो पुढे सुखदुःखाचे अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो पण…*

          *आयुष्य का जगतो ? कशासाठी जगतो ? कुणासाठी जगतो ? याची मात्र काहीच कल्पना नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करतो, पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो…. पण त्याला ‘ समाजसेवेचे नाव ‘ देतो !* 

          *आपल्या आयुष्याचे सुरुवातीचे काही काळ वाईट वागण्यात घालवतो असे काही लोकांचे आयुष्य असते.*

 *पण……माणसाला समाजसेवे करिता वेळ असायला ‘ त्याच्या बीजात समाजसेवा असावी लागते.’*

           *तुकाराम महाराज म्हणतात …* 

     *शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी l* 

*त्याचं बीज शुद्ध असावं लागतं. जो माणूस समाजाच्या फोकस मध्ये येण्याकरता आयुष्य जगतो, मेल्यानंतर मात्र त्याचं अस्तित्व कायमच संपत कारण…*

            *आपण जगलो असतो ते*

         *केवळ आपल्या कुटुंबापर्यंत* 

*मी व माझे कुटुंब, एवढंच आपलं जग असतं.*

 

        *माणूस मोठा नसला तरी चालेल पण माणसाचं मन मोठं असायला पाहिजे गरजेपुरते स्वतःला आणि बाकीचं गरजूंना देण्यातच माणसाचं मोठेपण असतं सोबत काहीच न्यायचं नसतं सारं इथंच ठेऊन जावं लागतं म्हणून रोज थोडं स्वतःबरोबर इतरांसाठी ही जगावं लागत..!*

        ……मो.नं. 9763126813

Previous articleसात महिने उलटले तरीही सिंचन विहीरीचे बिल मिळेना!
Next articleकपिला नदी व नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाह अडवल्याने संभाजी नगर रोडला तलावाचे स्वरूप.