Home Breaking News “आम्ही भटके विमुक्त जमातीचे” , आमची मतं मागायला येऊ नका; 

“आम्ही भटके विमुक्त जमातीचे” , आमची मतं मागायला येऊ नका; 

समाजाच्या अंतरंगातील वेदनेतुन उमटला प्रस्थापित व्यवस्थे विरोधातील एल्गार 

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज मो. नंबर – 8983319070

भटक्या विमुक्त जमातीच्या वस्तीमध्ये सध्या झळकत असलेल्या ब्यॅनरने या समाजाच्या अंतरंगातील खदखद दिसून येत आहे. साधे जातींचे प्रमाणपत्र मिळत नाही, मग योजनांचा लाभ मिळणे तर शैकडो मैल दूर, अशी भावना मांडत आमच्या वस्तीत कुठंल्याही राजकीय पार्टीने येवू नये, असे फलक विदर्भातील भटक्या विमुक्त जाती जमातीच्या अनेक वस्त्यांमध्ये लावण्यात आले आहेत.

आता निवडणूकीची वेळ आल्याने सर्व पार्टीचे उमेदवार वस्तीत येवून मते मागणार, मात्र आयुष्याचे साधे प्रश्न सुटत नसतील तर या लोकशाहीचा फायदा काय? आमची जात वैद्य नाही, तर मग आमचे मतदान कसे वैध, असा उव्दिग्न सवाल हे नागरिक करीत आहेत. त्यामुळे कोणत्याही पार्टीच्या उमेदवारांनी मतदान मागायला आमच्या वस्तीत येऊ नये आणि आपला फुकट वेळ गमावू नये, असे फलक वस्त्यांवर सर्वत्र लावल्याचे दिसतआहे.

हेमंत शिंदे – (अध्यक्ष) महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ
(संपादक) – “भटक्या विमुक्तांचे अंतरंग विशेषांक “प्रतिक्रिया :-

महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जाती जमातीतील विदर्भातील बांधवांनी ही जी प्रस्थापित पार्टी व त्यांच्या उमेदवारां विरुद्ध लोकशाहीतल जे ब्रम्हात्र रुपी जे मतदानाचे अस्त्र वापरून विरोध दर्शवला आहे, त्याच्या या भूमिकेचे महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे.
उर्वरित महाराष्ट्रातील खान्देश, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई येथील समाजाच्या बांधवांनी अशीच सढेतोड भूमिका घेऊन वर्षांनु वर्ष भटक्या विमुक्त जाती जमातीवर होणाऱ्या अन्याया ची परतफेड करण्याची सुवर्णसंधी साधावी ही नम्र विनंती करतो.

Previous articleहिंदी प्राथमिक माध्यमिक विद्यालय सिडको, नाशिक मध्ये दिपोत्सव उत्साहात साजरा
Next articleदिपावली पावन पर्वावर क्रिक्रेटच्या निमित्ताने मित्रांनी मैत्री जपली…