मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 24 ऑक्टोबर 2024
नांदेड जिल्ह्यातील विकासापासुन कोसोदुर असलेला तालुका म्हणजे हिमायतनगर तालुक्याचे नांव प्रामुख्याने घ्यावे लागेल. शेतकरी आणी शेतीविषयक शासकीय योजना यामधील महत्वाचा दुवा म्हणजे तालुका कृषि अधिकारी कार्यालय….महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या विविध योजनेचा प्रसार आणी प्रचार होऊन शेतक-यांला त्या विविध योजनेचा लाभ मिळण्यासाठी हे कार्यालय अतिशय महत्वाची भुमिका निभावते..
दिनांक 23 रोजी हिमायतनगर तालुका कृषि कार्यालय येथे पदोन्नतीने आलेले बाळाप्रसाद बंदेल हे मावळते प्रभारी तालुका कृषि अधिकारी डी. व्ही.
जाधवसाहेब यांच्या प्रमुख उपस्थीतीमध्ये कार्यभार त्यांनी स्विकारला आहे. यानंतर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन जाधव सर, काळे साहेब यांनी स्वागत केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी कृषि अधिकारी एम.एस.काळे साहेब, कृषि सहायक बि. डी. माझळकर, एस. माने साहेब, लोखंडे, राहुलवाड, अमोल भाऊ सुदेवाड, बेहेरे-ढगे मॅडम, गारोळे मॅडम आदिंची उपस्थीती होती.