ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674
जलंब : सध्या पावसाच्या अनियमित आणि लहरीपणामुळे “कही खुशी कही गम’ अशी स्थिती असल्याचे चित्र दिसून येत आहे. शेगाव तालुक्यात परिसरात या वर्षी पावसाच्या जोरदार आगमनाने सुरुवातीला बळीराजा सुखावला होता. मात्र, आता रोज रिमझिम पाऊस सुरू असल्याने परिसरातील बळीराजा हवालदिल झाला आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पीक धोक्यात आले आहे.काही शेतात सोयाबीन सोगणी करून पडलेली आहे तरी काहींच्या सोयाबीन गंज्या लागलेल्या आहेत परंतु दररोजच्या पावसामुळे शेतात ट्रेक्टर सुध्दा जाऊ शकत नाही या भागातील शेतांमध्ये अक्षरशः तळे साचले आहे, त्यामुळे ही पिके आता शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी बँका, सहकारी सोसायटींची कर्जे घेतली असून काहींनी खासगी लोकांकडून उसनवारी करून पिकांसाठी पैसे उभे कले आहेत. आता पीकच हातून गेले तर काय करायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अतिपावसामुळे या भागातील शेतकरी आता हवालदिल झाले असून, मोठ्या कष्टाने वाढवलेले पीक आता सोडून द्यावे लागणार असल्याची खंत शेतकऱ्यांना त्यांना