Home Breaking News जलंब माटरगाव शिवार संततधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान

जलंब माटरगाव शिवार संततधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान

अद्याप पर्यंत तरी शेतकर्‌यांना दिलासा देण्यासाठी कोणताही, अधिकारी किंवा कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर आलेला नाही.

ग्रामीण प्रतिनीधी संदिप देवचे 9860426674

जलंब परिसरात संततधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतात पाण्याचे तळे तयार झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाला असून नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. चालु आठवडयात दिनांक 9 ते 11 पावसाने चांगलाच मुक्काम ठोकला असून सतत पडणाऱ्या पावसामुळे, सोयाबीन, तूर, या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.काही शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगनी केली तर काहींनी सोयाबींन कंज्जी लावली होती परंतु शेतकऱ्यांचे कष्ट व मेहनत पाण्यात गेली आहे. महागामोलाचे बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करून अंतर्मशागतीसाठीही शेतकऱ्याला मोठा खर्च आता आहे. पावसामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची तीता पाहता शेतकऱ्यांना निसर्गाच्या अवकृपेचा मोठा फटका बसला आहे. या आठवडयात शेगाव तालुक्या मध्ये पावसाने बर्यापैकी मुक्काम तोकला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं सोयाबीन, भुईसपाट झाली आहेत. आता जगायचं कसं? हाच प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा

आहे. शेतात केलेल्या कष्टाचा मोबदला तर सोडाच परंतु केलेला खर्च तरी मिळेल की नाही? या वितेने शेतकरी हताश झाला आहे. मात्र अद्याप पर्यंत तरी शेतकर्‌यांना दिलासा देण्यासाठी कोणताही, अधिकारी किंवा कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर आलेला नाही. त्यामुळे शेतक‌ऱ्यांना कोणी

वाली आहे का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतक‌ऱ्यांनी माहागामोलाचे बियाणे खरेदी करून बियाणे, खते, किटकनाशके आदी खरेदी करण्यासाठी खिशात पैसा नसल्यामुळे पैशांची जुळवाजुळव केली वरचेवर हवातसा पाऊस पडत गेल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आनंदाने पिकाची मशागत केली. साहजिकच पीकेही जोमात आली होती. यंदा आपल्याला चांगले उत्पादन मिळणार अशी शेतकऱ्यांना आस लागली होती. शिवार कसा हिरवागार झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं. मात्र या आयात झालेल्या जास्तीच्या पावसामुळे केवळ पिकाचेच नुकसान झालं नाही, तर अनेक शेतकऱ्यांच्या शेती सुद्धा खरखून गेल्या अनेक शेतक‌ऱ्यांचे एवढे नुकसान झाले की ते भरपाई मागण्यापलीकडे आहे. शासन व प्रशासन दरवेळी पंचनामे करते मात्र मदत दिली जात नाही त्यामुळे केवळ पंचनाम्याचा दिखाऊपणा न करता जिल्हाधिका‌ऱ्यांनी तात्काळ पावले उचलून कोणतेही पंचनामे न करता शेतकर्याच्या खात्यात आर्थिक मदत वर्ग करावी अशी मागणी शेतकरीवर्गा कडुन होत आहे.

Previous articleकॉग्रेसला अकोला जिल्ह्यात मोठा झटका
Next articleसिद्धांतवादी राजकीय विचारप्रणालीचा ह्रास!