Home Breaking News पावसाने हुलकावणी दिल्याने कपासी पिके करपली….

पावसाने हुलकावणी दिल्याने कपासी पिके करपली….

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 04 ऑक्टोबर 2024

हिमायतनगर तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून खरीप हंगामातील सप्टेंबर महिन्यातील नक्षत्र उतरा आणि हस्त यामध्ये परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या पिकाला दिलासा देणारा असतो. परंतु सप्टेंबर महिन्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कुठे पाऊस तर कुठं कडक उन्ह पडल्याने कपासीचे करपले आहे. आधी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांना सावरण्यासाठी वेळ लागला. त्यातुन कशीबशी पिकं सावरली मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी सोईसुविधा उपलब्ध नाही. त्या शेतकऱ्यांचे कपासी पिक कडक उन्हाने अक्षरशः करपुन गेले आहे. गतवर्षीचे सोयाबीन आणि कापूस पिकाचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले खरे.. परंतु त्या मदतीत शासनाने भरघोस वाढ करावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

Previous articleघटस्थापनेच्या मुहूर्तावर माहूर ते सिरंजनी दिव्य ज्योती चे आयोजन…..
Next articleदेवीचा मंडप बांधतांना शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू डोलारखेड येथील दुर्देवी घटना