Home Breaking News ज्येष्ठ पत्रकार अनिल कुमार मादसवार यांना दैनिक गांवकरीचा उल्लेखनीय विशेष पुरस्कार देण्यात...

ज्येष्ठ पत्रकार अनिल कुमार मादसवार यांना दैनिक गांवकरीचा उल्लेखनीय विशेष पुरस्कार देण्यात आला…..

अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी

2 ऑक्टोबर रोजी झालेल्या नांदेड येथील दैनिक गांवकरी वृत्तपत्राच्या विशेष कार्यक्रमात पत्रकारितेची 85 वर्षाची परंपरा असलेलं “दैनिक गांवकरी परिवाराच्या वतीने नाविन्यपूर्ण कामगिरी करणारे तसेच हिमायतनगर तालुक्यासह संबंध नांदेड जिल्ह्यात एक निर्भीड पत्रकार तसेच रोखठोक प्रखर बातम्यांसाठी नावलौकिक असलेले हिमायतनगर शहराचे पत्रकार अनिल कुमार मादसवार यांना दैनिक गांवकरी या वृत्तपत्रात जाहिरात व बातम्यांच्या कार्यात उल्लेखनीय अशी कामगिरी केल्यामुळे अनिल कुमार मादसवार यांचा विशेष सन्मानीत करण्यात आले हा कार्यक्रम नांदेड शहरातील हॉटेल ताज व्हीआयपी रोड येथे पार पडला, याप्रसंगी गावकरीचे संपादक दिनेश हारे, आवृती प्रमुख प्रल्हाद उमाटे यांच्याहस्ते हा स्वागत सत्कार करण्यात आला, यावेळी नांदेड जिल्हा प्रतिनिधी अशोक काकांडीकर, विभागीय जाहिरात व्यवस्थापक भाऊसाहेब वडजे पाटील, समन्वयक शेख इसाक आदींसह हिंगोली, परभणी, लातूर नांदेड जिल्ह्यातील वार्ताहर उपस्थित होते.

Previous articleनगरपंचायत प्रशासनाचे हिमायतनगर शहराकडे साफ दुर्लक्ष….
Next articleघटस्थापनेच्या मुहूर्तावर माहूर ते सिरंजनी दिव्य ज्योती चे आयोजन…..