Home Breaking News नासिक येथे भाग्योदय राष्ट्रीय राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये कवी मनोहर पवार यांचे काव्य...

नासिक येथे भाग्योदय राष्ट्रीय राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये कवी मनोहर पवार यांचे काव्य वाचन .

शेगाव प्रतिनिधी शितल शेगोकार

अंधार फार झाला एक दिवा पाहिजे । ताई तुझ्या डोळ्यात अंगार पाहिजे ॥
शब्दा सुरांच्या मैफलीत…..
कवी मनोहर पवार यांनी केला…. नारीशक्ती चा काव्यजागर।
नासिक )रविवार दि. २२ / २०२४ रोजी माहेर मंगल कार्यालय 1 येथे आयोजित ३ रे भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंच व्दारा राष्ट्रीय कवी संमेलनात, निमंत्रीत काव्य मैफलीत कवी मनोहर पवार केळवदकर यांनी ‘ आपल्या, नारी तुझ्या डोळ्यात गं अंगार पाहिजे या ‘ उद्बोधक काव्य उत्कृष्ट रचना सादरीकरण केली . त्यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा – सुप्रसिद्ध कवियत्री प्रा . सुमती पवार ‘ आणि उदग्घाटक – मा . जेष्ठ कवी चंद्रकांत दादा वानखेडे पूणे आणि आयोजिका कवियत्री मा .सौ . भाग्यश्री बागड आणि संपादक कवी / गायक मा .- प्रमोद सुर्यवंशी आदी हजर होते.

नारीशक्ती पुरस्कार वितरण आणि साहित्य रत्न पुरस्कार वितरण आणि निमंत्रितांचे काव्य संमेलन असे बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन भाग्योदय समुहाच्या संस्थापिका ‘अध्यक्षा मा . सौ. भाग्यश्री बागड आणि आयोजक मा प्रदिप बडदे मुंबई यांनी केले होते .सनई चे बासरीचे मधूर सुर चौघडा या मंगल वाद्य वाजवून कार्यक्रमास सुरुवात झाली . पुरस्कार वितरण नंतर निमंत्रिता चे कविसंमेलन यात महाराष्ट्र राज्यासह गुजरात आध्रा आदी राज्यातून ७०कविंनी सहभाग नोंदविला . यात बुलढाणा चिखली येथून कवी शाहीर, मनोहर पवार यांनी अंधार फार झाला । एक दिवा पाहीजे । घरोघरी आता एक शिवा पाहीजे । या कवितेने रसिकांची दाद मिळाली . आपल्या काव्यात पुढे ते म्हणतात – विनभंग अत्याचार । होई गल्लो गल्ली । सुरक्षित ना कोलकता । मनीपूर दिल्ली । घराघरात आता फुलन झाली पाहिजे । नारी तुझ्या डोळ्यात अंगार पाहीजे। अत्यंत संवेदनशिल आणि महिला संरक्षणा साठी जागृती या गीताने केली .कवी डॉ. मंजूराजे जाधव यांनी ., बाप ‘ ही भावनिक सुंदर कविता सादर केली तर केळवद चे युवक कवी संजय हिवाळे . ही नवलाई घामाच्या धारेत । रंग मिसळू दे | रंगाच्या रे षेत । जीवन उसळू दे |अशी घामाची अस्सल ‘यांनी कविता सादर केली .

Previous articleगट नं 759 जलंब भाग 2 मधे स्टोन क्रशरला परवाना देऊ नये शेतकऱ्यांचे तहसिलदार तथा ग्रामपंचायतला निवेदन,
Next articleमुख्याध्यापक शिक्षण व्यवस्थेचा मुख्य कणा व सर्वेसर्वा असुन त्यांचा अभिमन्यू झालेला आहे ; शिक्षक आमदार  विक्रम काळे .