Home Breaking News जनसामान्या साठी अहोरात्र झगडणारा लोकनेता .. बाबुरावजी कदम कोहळीकर

जनसामान्या साठी अहोरात्र झगडणारा लोकनेता .. बाबुरावजी कदम कोहळीकर

सत्य हे झाकत नाही, लपत नाही, किंवा कुणी चोरून ही नेऊ शकत नाही त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे…..

ना बाबुरावजी कदम कोहळीकर….

प्रामुख्याने या व्यक्ती बद्दल सांगायचं म्हणजे त्यांनी केलेल्या कामाची स्तुती ते स्वतः करीत नाहीत……

विशेष बाब आज पर्यंत त्यांनी कोट्यावढी रुपयाचे कामं आणलेत ती कामं मार्गी लावलीत……

काल परवा घरकुलची रखडलेली यादी त्यांनी पाठपुरावा करून

मंजूर करून आणली आहे त्याच श्रेय कुणी लाटण्याचा प्रयत्न करणे म्हणजे नवलच…….

विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीकडे कुठलच पद नाही अशी व्यक्ती प्रयत्नाची परकाष्ठा करून

सर्वसामान्य जनतेसाठी झटतो ही बाब असामान्य आहे…

खरं तर आज पर्यंत बाबुरावजी यांचा प्रवास खूप खडतर झाला असून हा व्यक्ती खचून नं जाता पुन्हा

नव्या जोमाने उभा राहतो हदगाव हिमायतनगर विधानसभा क्षेत्रातील लोकांचे अमाप प्रेम व जिव्हाळा या व्यक्तीपाठीमागे आहेच यात शंका नाही….!

राजकारण हा मोठा जुगार आहे, काही लोकं खेळतात ते धनवान होण्यासाठी आणि बाबुरावजी सारखी माणसं

धनवान होण्या पेक्षा कीर्तिमान होण्यात धन्य समजतात हा नक्कीच फरक आहे…..

गरीब जनतेसाठी आरोग्य सेवा ही त्यांचा आवडता

छंद आहे, त्यासाठी त्यांनी आरोग्य शिबीर घेऊन कित्येक लोकांचे आरोग्य दैदीप्यमान केले हे सर्वांना ज्ञात आहे….

आजच्या घडीला मा. मुख्यमंत्री साहेबांच्या मर्जितला

माणूस म्हणून त्यांची ओळख आहे… शिवाय शिंदेसाहेब

त्यांचा शब्द टाळू शकत नाहीत त्याच कारण हा माणूस भेटला की जनतेच्या समश्या मांडतो व तो सोडवसाठी धडपडतो एव्हडेच…..!!

त्यांचे बद्दल अजून बरंच काही ….पुढच्या लेखात

अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनीधी

Previous articleबुलढाणा जिल्ह्यात करणी सेना, महाराष्ट्र चे हिंदूधर्म रक्षक संघटीत करण्यासाठीं जोरदार सुरुवात
Next articleकल्याणरावजी आखाडे यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधान परिषदेवर संधी द्यावी –