Home Breaking News आठ फुट लांब अजगराला दिले जीवदान

आठ फुट लांब अजगराला दिले जीवदान

जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट मो 8888872854

पारस येथील वन्यजीव बहुउद्देशीय संस्था येथील सर्पमित्र प्रतिभाताई ठाकरे व सर्पमित्र दीपक लोड यांनी दिले अजगराला जीवनदान. 

प्रतिनिधी पारस येथून जवळच असलेल्या मनारखेड गावातील अभी पाटील यांच्या शेत शिवारात भला मोठा साप शेतकऱ्यास दिसून आला त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच गावातील सर्पमित्र दीपक लोड यांना संपर्क केला दीपक लोड यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत पाहिले असता त्यांना अजगर साप आढळून आला परिस्थिती अत्यंत वाईट होती म्हणून त्यांनी लगेच पारस येतील सर्प मैत्रीण प्रतिभाताई ठाकरे यांना लगेच मनारखेड येथे बोलून घेतले प्रतिभाताई ठाकरे व शुभम लोडगे लगेचच क्षणाचा विलंब न करता मनारखेड येथे पोहोचले आणि त्यांनी सापाची पाहणी केली असता त्यांच्या लक्षात आले की हा अजगर जातीचा साप आहे त्यांनी लगेचच अजगर

सापाला रेस्क्यू केले व शेतातील काम करणाऱ्या मजुरांना सापाबद्दल माहिती दिली त्यांनी सापाबद्दल माहिती देताना सांगितले की हा साप जंगलामध्ये पाणथळ जागा तसेच गाव मध्ये राहणं पसंद करतो या सापाची अधिक दम लांबी ही १५ ते १६ फूट लांब राहते हा साप उंदरापासून ते वाघापर्यंत हा सहजरित्या शिकार करू शकतो हा साप किंवा नदीच्या आसपास किंवा पाणथळ जागेमध्ये राहणं पसंत करतो अशी माहिती त्यांनी तेथील गावकऱ्यांना दिली व सापाला सुरक्षितपणे रेस्क्यू करून वन्यजीव अधिकारी श्री.इंगळे साहेब

यांच्या मार्गदर्शनाखाली अजगर सापाला वन्यपरिषेत्रात सोडण्यात आले यावेळेस गावकऱ्यांनी प्रतिभाताई ठाकरे व दीपक लोड यांचे भरभरून कौतुक सुद्धा केले

Previous articleस्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांचा नांदेड मधील हदगाव हिमायतनगर भागात ओला दुष्काळ पाहणी दौरा ;
Next articleबुलढाणा जिल्ह्यात करणी सेना, महाराष्ट्र चे हिंदूधर्म रक्षक संघटीत करण्यासाठीं जोरदार सुरुवात