👉 आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी तहसीलवर मोर्चा.
हिमायतनगर तालुक्याती सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे जनावरे, ठिबक सिंचन वाहुन गेले त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. पावसाचे पाणी घरात, दुकानात शिरून नुकसान झालेल्यांना तात्काळ पन्नास हजाराची मदत करावी. पिकविमा कंपनीकडून लाभार्थ्यांना 25% अग्रिम रक्कम देण्यात यावा. घरात पुराचे पाणी जावुन नुकसान झालेल्यांना तात्काळ राशन देण्यात यावे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी ई- पिक पाहणी केली नाही. त्याही शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजाराचे अनुदान वितरीत करण्यात यावे. या आधी मागण्या घेऊन हिमायतनगर तहसील कार्यालयावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे दिनांक 09/09/2024 रोजी सोमवारी सकाळी 10:00 वाजता हदगाव- हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे. असे हिमायतनगर तालुका काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले आहे.