सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी
हिमायतनगर – मा.मुंबई उच्च न्यायालयच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठा कडुन कामारवाडीच्या सरपंच सारीका श्याम हुलकाने यांच्यावर मा.जिल्हाधिकारी नांदेड यांनी नियमा प्रमाणे मासीक व ग्रामसभा न घेतल्याच्या कारणावरून करण्यात आलेली अपात्रची कारवाई रद्द करत त्यांना सरपंचपदी कायम ठेवण्यात आले. सरपंच सारीका श्याम हुलकाने यांच्या वतीने ऍड.रवींद्र गोरे यांनी बाजु मांडली.
याविषयी सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायत कामारवाडीच्या सरपंच सारिका शामसुंदर हुलकाने यांनी नियमानुसार ग्रामसभा व मासिक सभा घेतल्या नसल्याने त्यांना नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उर्वरित कालावधीसाठी ग्रामपंचायतच्या सरपंच पदावरून करण्याची नोटीस पाठवली होते. पण याविरोधात सरपंच सारिका हुलकाने यांनी उच्च न्यायालयात याचिका टाकली.
ग्रामपंचायत कामारवाडी चे पाच सदस्य अनुक्रमे संतोष उत्तमराव देवराये,उपसरपंच गोदावरी बाई प्रकाश कलाने,चंद्रकलाबाई विलास मनमंदे, सुरेखा मारुती मनमंदे आणि अमोल केशव सूर्यवंशी इत्यादींनी सरपंच हे नियमानुसार ग्रामसभा व मासिक सभा घेत नसल्यामुळे गावाचा विकास थांबला आहे त्यामुळे त्यांना उर्वरित कालावधी साठी सरपंच पदावरून त्यांना बडतर्फ करावे असा विवाद अर्ज नांदेड येथील ऍड काकडे यांचे मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दाखल केला होता.
सदर प्रकरणात संबंधितांना नोटीसा पाठवून आपापली बाजू मांडण्याची संधी दिली व गटविकास अधिकारी पंचायत समिती हिमायतनगर यांचेकडून ग्रामसभा व मासिक सभा बाबतचा अहवाल मागवला गेला. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद एकूण अहवालाचे निरीक्षण केल्यास सरपंचाने नियमानुसार मासिक ग्रामसभा घेतल्या नसल्याने त्यांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी उर्वरित कालावधीसाठी सरपंच पदावरून बडतर्फ केले होते.
परंतु सरपंच सारिका हूलकाने यांनी याविरोधात न्याय मागण्या साठी उच्च न्यायालयात याचिका टाकली. हुलकाने यांच्या वतीने ऍड.रवींद्र गोरे यांनी बाजू मांडत विरोधी पक्षाचे म्हणणे खोडून काढले आणि सरपंच सारिका हुलकाने यांच्यावर झालेली अपात्रतेची कारवाई रद्द करण्याची बाजू मांडली. यावर उच्च न्यायालयाने निकाल देताना सरपंच यांच्यावरील अपात्रतेची कारवाई रद्द करत त्यांना सरपंच पदी कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत.