जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट मो ८८८८८७२८५४
बाळापुर तालुक्यात असलेले वाडेगाव .अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार काकाचा जागीच मृत्यू झाला तर पुतणी गंभीर जखमी झाल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अकोला वाडेगाव रस्त्यावर इंदिरानगर नजीक घडली
प्रविण डोंगरे वय २५ रा.वाडेगाव इंदिरानगर हे त्यांच्या पुतणीला दुचाकीवरून गावातील बेसिक शाळेतून घरी घेऊन येत होते. दरम्यान इंदिरानगर जवळच अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकी चालक प्रवीण डोंगरे याचा जागेवरच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार यांची १३ वर्षीय पुतणी गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व स्थानिक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी मुलीला तातडीने रुग्णावाहिकेने उपचारासाठी अकोला येथे पाठविले.
परंतु मुलीला जास्त दुखापत झाल्याने तिला नागपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.
अशी माहिती रुग्णवाहिकेचे डॉ सोहेब यांनी दिली.
पोलिस कर्मचाऱ्यांनी.घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविला.
याप्रकरणी अज्ञात वाहन चालकांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे