अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनीधी
करंजी नगरीचे भूमिपुत्र श्री अनिल लक्ष्मण माने यांना तमिळनाडू केंद्रीय विश्वविद्यालयातून पी.एच.डी. हिंदी पदवी प्रदान करण्यात आली. अत्यंत कठीण परिश्रमाने, आपल्या जिद्दीच्या जोरावर प्राध्यापक डॉक्टर अनिल लक्ष्मण माने यांनी हा बहुमान मिळवीला आहे. त्यांचा पी.एच.डी. चा शोध विषय – “आधुनिक हिंदी कविता और मानव मूल्य” (इक्कीसवीं सदी के प्रथम दशक के विशेष संदर्भ में) हा होता. या यशामध्ये त्यांना शोध निर्देशक – आचार्य. एस. वी. एस. एस नारायण राजू यांच मोलाचे मार्गदर्शन मिळाले. अत्यंत खडतर परिस्थितीत सुद्धा अनिल यांनी शिक्षणाची जिद्द सोडली नाही.आई वडिलांच्या आशीर्वादाने हे सर्वोच्च यश मिळवल. सर्वप्रथम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठ अंतर्गत बळीराम पाटील कॉलेज किनवट येथून त्यांनी बी.ए. ची पदवी घेतली. उच्च शिक्षणासाठी हैद्राबाद केंद्रीय विश्वविद्यायातुन एम. ए. पूर्ण केले व तसेच महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथून त्यांनी एम. फिल. पूर्ण केलं आणि तमिळनाडू केंद्रीय विश्वविद्यालयातून त्यांनी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी पी.एच.डी. हिंदी अवार्ड मिळवला. त्यांना मिळालेल्या या अमूल्य यशात आई नम्रता लक्ष्मण माने, वडील लक्ष्मण तुकाराम माने, भाऊ शिवाजी लक्ष्मण माने, श्रीकृष्ण लक्ष्मण माने, मामा प्राध्यापक डॉ. ज्ञानेश्वर सूर्यवंशी, श्री रमेश नारायण सूर्यवंशी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभल. तसेच मित्रपरिवार व गावकरी यांचे त्यांनी आभार मानले.त्यांनी या मिळवलेल्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.