मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 21 जुलै 2024
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरजंनी, एकंबा, कौठा, कौठातांडा आदी गावाकडे जाणा-या रस्त्यावर मोठे भगदाड पडले होते. या गावांत महामंडळाची बस गेल्या आठ दिवसांपासून बंद होती. त्यामुळे हिमायतनगर येथील शाळेत शिकणाऱ्या मुला, मुलींचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते. हि बाब सिरजंनी येथील तरुण तडफदार, लोकप्रिय सरपंच पवन करेवाड आणि एकंबा येथील सरपंच प्रभाकर देशमुख यांनी आपल्या गावातील युवा कार्यकर्त्यांसह स्वतः फावडे, टिकास घेऊन रस्त्यावरील पडलेले भगदाड माती, दगड टाकून भुजविले.
गेल्या आठ दिवस झाले शासकीय कार्यालयात अर्ज देऊन सुद्धा अधिकारी आणि लोकप्रतिनिधीनी कुठलीही दखल घेतली नाही. असा आरोपही त्यांनी केला आहे.