Home Breaking News हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात मतदार पुर्ननिरीक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा:-

हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात मतदार पुर्ननिरीक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा:-

 भा.ज.पा.मराठवाडा बूथ संयोजक प्रवीणजी साले…
👉🏻भारतीय जन संघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी….
👉🏻” एक पेड़ माँ के नाम ” योजना अधिक व्यापक करून वृक्ष लागवड करा:-जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख

हिमायतनगर प्रतिनिधी अंगद सुरोशे /- शहरात आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि.6 जुलै रोजी भारतीय जनता पार्टीची मतदार पुर्न निरीक्षण कार्यक्रम बैठक शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीला मराठवाडा बूथ संयोजक प्रवीणजी साले, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष किशोरजी देशमुख यांनी प्रमुख उपस्थिती लाऊन भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले व हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये मागील पराभवाचे सूक्ष्म परीक्षण करून आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला सर्व बूथ प्रमुखांनी आपल्या मतदार पुनर्नरीक्षणावर लक्ष देऊन आपली मतदार यादी कशी प्रभावी बनवावी ह्या संदर्भात मार्गदर्शन केले..

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 6 जुलै रोजी हिमायतनगर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे भारतीय जनता पार्टी कडून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर हदगाव हिमायतनगर या दोन्ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची मतदान पुनर निरीक्षण कार्यक्रम बैठक आयोजित केली होती या बैठकीला मराठवाडा बूथ संयोजक प्रवीणजी साले, भाजपा जिल्हाअध्यक्ष किशोरजी देशमुख, जिल्हा संयोजक नांदेड बाबुरावजी केंद्रे, विधानसभा संयोजक चंद्रशेखर कदम, व्यापारी सेलचे जिल्हा अध्यक्ष शिरीष मनाठकर, जिल्हा सरचिटणीस लताताई फाळके, आशिष सकवान, गजानन तुप्तेवार ,हिमायतनगर तालुका अध्यक्ष गजानन चायल, हदगाव तालुका अध्यक्ष तात्याराव पाटील, भागवत देवसरकर सह आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन करताना भाजपाचे मराठवाडा बूथ संयोजक साले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये आगामी काळात 230 बुथ प्रमुखांनी आप आपापल्या बूथ ची ताकद वाढविण्यासाठी प्रभावीपणे काम करत मतदार पुनर्नरीक्षण याद्या तयार करून आपल्या बूथ वर मतदारांची टक्केवारी कशी वाढवता येईल याकडे लक्ष देऊन नवीन मतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रोसाईत करा व आपल्या बूथ मधील मयताची नावे वगळून त्यातील त्रुटी व दुरुसत्या शोधून आगामी काळात आपल्या मतदारांचा टक्का कसा वाढेल ह्यासाठी प्रत्येक बूथ प्रमुखांनी कार्य करावे असे उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख यांनी शासकीय विश्रामगृह परिसरात एक झाड लाऊन सर्व कार्यकर्त्यांनी ” एक पेड माँ के नाम ” ही योजना अधिक व्यापक करून प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी एक वृक्ष लावून सरल ॲप व नमो अॅप वर ते अपलोड करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्थसंकल्पातील गोरगरीब नागरिकांच्या कल्याणकारी योजनांची माहिती थेट जनते पर्यंत पोहोचत आहे की नाही याची पाहणी करून विश्वकर्मा योजना,लाडकी बहिण योजना , 80 कोटी लोकांना मोफत राशन, किसान सन्मान निधी अशा असंख्य लोक कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम आगामी विधानसभेच्या अगोदर करा असे आव्हान उपस्थित कार्यकर्त्यांना केले…
यावेळी मराठवाडा बूथ संयोजक प्रवीणजी साले, भाजपा जिल्हाअध्यक्ष किशोरजी देशमुख, जिल्हा संयोजक नांदेड बाबुरावजी केंद्रे, विधानसभा संयोजक चंद्रशेखर कदम,सोशल मीडिया जिल्हा संयोजक नागेश शिंदे, व्यापारी सेलचे जिल्हा अध्यक्ष शिरीष मनाठकर, जिल्हा सरचिटणीस लताताई फाळके, आशिष सकवान, गजानन तुप्तेवार , सुधाकर पाटील,प्रकाश राठोड ,हिमायतनगर तालुका अध्यक्ष गजानन चायल, हदगाव तालुका अध्यक्ष तात्याराव पाटील, हिमायतनगर भाजपा महिला अध्यक्ष रुघेताई ,ज्योतीताई बेदरकर भागवत देवसरकर, निळू पाटील, बापूसाहेब देशमुख, मारोती सूर्यवंशी, भाजपा हिमायतनगर शहर अध्यक्ष विपुल दंडेवाड , कल्याण ठाकूर, दुर्गेश मंडोजवार, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष लक्ष्मण डांगे, शितल सेवनकर, ओमकार चरलेवार,विशाल अंनगुलवार, प्रमोद भुसाळे,विशाल शिंदे, गजानन पिंपळे,परमेश्वर नागेवाड, सह असंख्य बूथ प्रमुख ,महिला व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleकपाशीतील आतंरमशागतीला आला वेग!
Next articleपुणेआंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवात ‘ कवी मनोहर पवार ‘यांचे काव्यवाचन .