Home Breaking News वाडेगांव येथे नवीन प्रसूती गृह बांधकामाचे भूमिपूजन..

वाडेगांव येथे नवीन प्रसूती गृह बांधकामाचे भूमिपूजन..

योगेश घायवट

वाडेगांव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील प्रसूती गृहाची दयनीय अवस्था झाली असल्यामुळे, कर्तव्यदक्ष जि.प.सदस्य मा.चंद्रशेखर चिंचोळकर साहेब यांनी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत दहा लक्ष रुपये निधी मंजूर केला व सदर विकास कामाचा भूमिपूजन सोहळा आज दि.२२ जून २०२४ रोजी दु. १ वाजता संपन्न झाला.

लोकप्रिय, कर्तव्यदक्ष जि.प.सदस्य मा.चंद्रशेखर चिंचोळकर साहेब यांच्या शुभ हस्ते सदर भूमिपूजन सोहळा पार पडला.

या प्रसंगी सरपंच मा.सौ.रूपाली ताई शहाणे, ग्रा.पं.सदस्यां सौ.अर्चना ताई मसने, ग्रा.पं.सदस्य सचिन धनोकार, राजकुमार अवचार, दत्ता लोखंडे, प्रकाश मसने, मोहनसींग लोध, राजू चव्हाण, राजू जंजाळ, किशोर अवचार, राधेशाम कळस्कार, प्रा.आ.केंद्राचे डॉ.सोहेल खान आणि सर्व कर्मचारी तथा गावकरी उपस्थित होते. या विकास कामामध्ये एक वेटिंग रूम, एक प्रसूती रूम आणि एक बाथरूम बांधण्यात येईल

Previous articleओ.बी.सी चे नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत हिमायतनगरातील ओ.बी.सी. बांधवांचे तहसीलदारांना दिले निवेदन…
Next articleहिमायतनगर शहरातील भाविक पायी दिंडी साठी पंढरपूर कडे रवाना…..