Home कृषीजागर पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात.

पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात.

👉 कृषि वार्तापत्र

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
दिनांक- 17 मे 2022

हवामान खात्याने मान्सुन अंदमानात दाखल झाला असुन लवकरच केरळमध्ये दाखल होत आहे. मुंबई येत्या दहा जुनला मान्सुन येणार आहे. असा हवामान खात्यांनी अंदाज वर्तवण्यात आला आहे.
त्यामुळे शेतकरी आपल्या काळया आईची सेवा करण्यासाठी खरीप 2022 या हंगामात पेरणीपूर्व मशागत करण्यासाठी जिवाचे रान करत आहे. शेतातील काडी, कचरा वेचुन उन्हातान्हात आपले शेतीशिवाय स्वच्छ करताना दिसत आहेत. खते आणि बियाण्याच्या गतवर्षीच्या वाढत्या किंमती पाहुन शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यावर्षी बियाणे, खते आणि किटकनाशकांची किमंतची काय परीस्थिती राहणार हा काळस सांगणार आहे.
👉 खरीप पुर्व बैठक कधी होणार?
कृषि विभाग आणि कृषि विभाग पंचायत समिती यांची दरवर्षी होणाऱ्या खरीप पुर्व मेळाव्यातुन शेतक-यांना चांगले मार्गदर्शन होत होते. परंतु आजतागायत या मेळाव्याचे आयोजन होत नाही. असे शेतकरी बांधवांनी बोलुन दाखवले.

👉 टॅक्टरने सर्व मशागतीची कामे पुर्ण करतात शेतकरी..

वाढत्या पेट्रोल आणि डिझेल च्या वाढत्या किंमतीमुळे शेताची मशागत करतांना सरास ट्रॅक्टरचा वापर होत आहे. ट्रॅक्टर मालकांचे भाव गगनाला भिडले आहेत.

👉 मजुरांचा अभाव.

शेतीच्या कामासाठी मजुर मिळेनासे झाले. म्हणुन मिळाले तरी मजुरी वाढवुन मागतात. अश्या सर्वच समस्यांना तोंड शेतक-यांना द्यावे लागते आहे.

Previous articleराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात साजरी करा…… रविराज घोंगे
Next articleपातूर तालुक्यांतील मळसुर गावात अग्नी तांडव..!