लग्न समारंभात नविनच उपक्रम आलेल्या पाहुणे वराडी मंडळीला चक्क झाडे भेट …
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी
आज सिरंजनी येथे श्री.नागनाथ भुमा शिल्लेवाड यांची जेष्ठ कन्या चि. सौ. कां. शिवानी व श्री. नारायण इंद्रवाड बरबडेकर यांचे जेष्ठ चिरंजीव गुरूदास यांचा विवाह सोहळा सिरंजनी येथे मोठ्या थाटा – माटात पार पडला.
लग्न समारंभ उरकून पाहुणेमंडळी घराकडे परतत असतांना वराकडील मंडळीने सर्वांना एक एक रोपटे भेट दिले व सिरंजनी ग्रामपंचायत ला 50 रोपे भेट स्वरूपात दिली.
*झाडे लावूया झाडे जगवूया*
हा संदेश दिला वराचे बंधू अविनाश इंद्रवाड यांनी वृक्ष लागवड आज घडीला किती अत्यावश्यक गोष्ट आहे. हे लग्न मंडपात उपस्थित सर्व मंडळींना समजावून दिले.
अश्या प्रकारे एक स्तुत्य व आदर्श विवाह सोहळा या परिवाराने घेतला हा उपक्रम आज घडीला खूपच अनुकरणीय असा वाटला अशा प्रतिक्रिया उपस्थितकडून येत आहेत.