मारोती अक्कलवाड सवनेकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेडदिनांक- 15 मे 2022
नेहमी प्रमाणे आपल्या शेतात काम करीत असतांना मौजे सवना ज. ता. हिमायतनगर येथील, प्रशांत पंजाब बिरकलवार वय (28) वर्ष हा शेत सर्वे नंबर 127 मध्ये हि घटना घडली असून, यूवक जखमी झाला आहे.
त्यांच्या डाव्या हाताला जबर मार लागला आहे. हाताच्या दोन कमड्या मोडल्या आहेत. असे एक्सरे काढल्यानंतर प्राथमिक उपचारानंतर कळाले आहे. अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी आमच्या प्रतिनिधींना भ्रमणध्वनीवर दिली. त्यासाठी हातात राॅड टाकण्यासाठी नांदेड येथे दवाखान्यात हलविले आहे.
👉 शेतातील रानडुक्कराचा वनविभागाने बंदोबस्त करावा.
आपल्या प्राणांची बाजी लावून बळीराजा आपल्या काळया आईची सेवा करीत असतो. परंतु वनविभागाच्या नाकर्तेपणामुळे जंगली प्राणी वानर, रानडुक्कर, रोई , कोल्हा, लाडंगा, हरीण यासारखे प्राणी शेतातील पिक उद्ध्वस्त करीत आहेत.
त्या पिकांची राखणं करतांना शेतक-याला आपला जिव धोक्यात घालून शेतातील पिकांचे उत्पादन घ्यावे लागते.
या जगंली प्राण्यांचा वेळीच वनविभागाने तत्परतेने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.