Home Breaking News सुर्य आग…ओकतोय! 👉 तापमानात प्रचंड वाढ

सुर्य आग…ओकतोय! 👉 तापमानात प्रचंड वाढ

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 30 एप्रिल 2024

उन्हाळा म्हटले लग्न, शाळेची सुट्टी, मामाचं गांव, विविध पर्यटन स्थळाला भेटी या बाबी आठवत असत…..परंतु उन्हाळी हंगामातील में महिना शिल्लक असतांच एप्रिल महिन्यात सुर्यनारायण 42° ने प्रचंड आग 🔥 ओकतो आहे. लग्न समारंभ अवकाळी पावसात पार पडले. शेतकरी बांधवांची उन्हाळी हंगामातील शेतीची मशागत करणे, अतिशय अवघड जाते आहे. हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरजंनी येथील एका युवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. नागरीकांनी आणि लहान मुलांनी काम असेल तरच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर योग्य होईल. असे जेष्ठ नागरिक सांगत आहेत.
शेतकरी बांधवांनी शक्य तो सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंतच शेतीची कामे करावीत असा सल्ला कृषि विभागातील तालुका कृषि अधिकारी यांनी दिला आहे.
लहान मुलांना पालकांनी शक्यतो प्रयंत घरातच मुलांचा अभ्यास करून घ्यावा. असे तज्ञ शिक्षकांचे मत आहे.
यावर्षी एप्रिल महिन्यातील तापमान पाहता में महिना प्रचंड तापमानात राहील असा तज्ञांचा अंदाज आहे. आणि जुन महिन्यात समाधानकारक पाऊस होईल असे हवामान तज्ञांचे मत आहे.

Previous articleबाळापुर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल जुमळे यांच्या वाहनाला अपघात
Next articleशिष्यवृत्ती परिक्षेच्या निकालाकडे महाराष्ट्र परिक्षा परिषद पुणे यांच्या सह शिक्षक गटशिक्षण अधिकारी बि. ओ. यांच दुर्लक्ष….