हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070
१ मे रोजी आजी आजोबा व पालक यांच्या शाळेत होणार सभा_*
नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग नाशिक
निवडणूक निर्णय अधिकारी व नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने C M C S कॉलेज नाशिक येथे शिक्षण उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक .म न पा व ९ तालुके या शाळांच्या मुख्याध्यापकांचे स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यात शाळांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शाळा स्तरावर राबविलेल्या उपक्रमाचा आढावा घेणे व त्याचे रेकॉर्ड शाळा स्तरावर अद्यावत ठेवणे व २० मे पर्यंत शाळा स्तरावर मतदान जनजागृती साठी व मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्यात आली. मुख्याध्यापकांना वेगवेगळ्या सूचना देण्यात आल्या मतदानाचे बूथ शालेय परिसरात असेल तर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असेल १ मे* *महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यार्थी व पालक प्रगती पुस्तक घेण्यासाठी त्यांच्या आजी आजोबांसह हजर ठेवून त्यांची मिटिंग घेऊन मतदान जनजागृती करणे आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेणे अशा सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या शाळा स्तरावर विविध उपक्रमांची पीपीटी तयार करून, ती शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्या मेलवर पाठवावी या संदर्भातील कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेसाठी व्यासपीठावर उपशिक्षणाधिकारी उदय देवरे गणेश फुलसुंदर प्रकाश अहिरे एम ओ पिंगळकर नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस बी देशमुख उपाध्यक्ष प्रदीप सांगळे, एस ए पाटील ,रोहित गांगुर्डे, बाबा खरोटे, डॉ अनिल माळी एम डी काळे, वी के अलगत,वी जे आघाव यांच्यासह ४५० पेक्षा जास्त मुख्याध्यापकानीं या कार्यशाळेचा लाभ घेतला.