Home Breaking News जगद्गुरु संत तुकाराम महाराज बिजमहोत्सव निमित्त जलंब येथे भव्य दिंडी सोहळा

जगद्गुरु संत तुकाराम महाराज बिजमहोत्सव निमित्त जलंब येथे भव्य दिंडी सोहळा

त्या निमित्त आमदार आकाश दादा यांची सदिच्छ भेट ..संदिप देवचे ग्रामीण प्रतिनिधी

महाराष्ट्र ही संतांची भूमि आहे. अनेक संप्रदाय उदयास आले. महाराष्ट्राच्या इतिहासात वारकरी पंथाला विशेष स्थान आहे. संत तुकाराम महाराज म्हणजे वारकरी परंपरचे कळस आहेत. त्यांची अभंग गाथा मानवी जीवन जगण्यास उपयुक्त मार्गदर्शक ग्रंथ आहे. तुकोबारायांचा बीज सोहळा संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या भव्य-दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येतो.त्या निमित्त आज जलंब येथे सुध्दा बिज सोहळा करण्यात आला सर्व प्रथम आज सकाळी किर्तनाचे कार्यक्रम ठेवण्यात आला व नंतर महाप्रसाद चे नियोजन समाजबांधवांकडुन ठेवण्यात आले होते व संध्याकाळी
भव्य दींडी सोहळा काढण्यात आला अतिशय नियोजनबंध सोहळा आज पार पडला सर्व प्रथम असंख्य सामाज बांधव भाविकभक्त तुकाराम महाराजांची पुजार्चना करून असंख्य टाळकरी व महीला टाळकरी समाज बांधव भावीकभक्त सह दींडी ला सुरूवात झाली शोभायात्रा टाळमुरूदंगासह जणु संपुर्ण जलंब गाव भक्तीमय झाले होते ठीक-ठीकाणी चौकात फटाक्यांच्या आतीशबाज्या होत होत्या चहा पाणी शरबत ची व्यवस्था संत तुकाराम महाराज चौक येथे केली होती
मिरवणुकीतील शिस्त संयम वाखाणण्याजोगं चित्र होतं.
महिला पुरुष ताळ मृदंग संत नामाचा गजर. हे सारं काही सुंदर दृश्य दिसत होतं.व्यवस्थापन सुद्धा अप्रतिम आजचे नीयोजण करणारे बिज उत्सव समीतीचे अधक्ष गौरव साबळे व त्यांचे सहकारी मित्र त्यांच कौतुक करण्या सारखे आहे

Previous articleहिंगोली लोकसभा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडे!
Next articleबैलजोडीची किंमत लाखावर गेल्यावर शेतक-यांना ट्रॅक्टरने मशागत करावी लागते.