जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट
बाळापूर वाडेगाव = पोलिस चौकीअंतर्गत पंचशील नगरमधील सार्वजनिक विहिरीत मंगळवार दि.२६ मार्च रोजी एका २५ वर्षाय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने येथे एकच खळबळ उडाली.सकाळी या विहिरीवर काही महिला पाणी भरण्यासाठी गेल्या असता त्यांना विहिरीत मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला .
पंचशील नगर येथील रहिवासी विशाल डोंगरे वय ३० वर्षं यांची पत्नी नामें लक्ष्मी विलास डोंगरे यांचा मृतदेह असल्याचे समोर आले आहे.
महिलेची प्रकृती बरी नसल्याने तिच्यावर उपचार करायचे होते.परंतु विशाल डोंगरे हे अत्यंत गरीब असून ते बांधकाम मजुरीचे काम करतात. मंगळवार ते त्याची पत्नी लक्ष्मीला उपचारासाठी रूग्णालयात घेऊन जाणार होते .
मजूरीचे पैसे घेऊन घरी आलो होतो.परंतू अचानक मध्यरात्री लक्ष्मी झोपेतून उठली आणि कुणाला ना सांगता निघून गेला.
सकाळी लक्ष्मीची शोधाशोध केली असता ती दिसली नाही.सकाळी तिचा मृतदेह विहिरीत आढळून.आला
घटनेची माहिती पोलिस चौकीला दिली असता.चौकीचे ठाणेदार पंकज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विनायक पवार आणि गावंडे यानी मृतदेह बाहेर काढून आणि पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठविला