Home Breaking News महीलांचा स्वत:कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहीजे

महीलांचा स्वत:कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहीजे

आजच्या वर्तमान स्थितित
प्रशासकीय, राजकीय, सामाजिक, साहित्यीक,वैज्ञानिक वा विविध क्षेत्रात उच्च पद प्राप्ति करुनही जर महीला म्हणून स्वत:कडे अबला वा कमजोर समजत असतील तर गेल्या काही दशकापासुन स्त्री पुरुष समानता, या तत्वावर जे मूल्य शिक्षणाचे धडे बालमनावर बिंबवल्या जातात ते निरर्थक ठरतील
तसेच महीला सक्षमीकरण करणारच्या ज्या योजना मोठ्या दिमाखात शासनस्तरावर राबवल्या जातात त्यामधुन निष्पन्न काय होत आहे यावर मंथन होणे गरजेचे आहे आजच्या तंत्रज्ञान युगामध्ये स्त्रीयांनाही मोबाइल घराघरात कुशलतेने हाताळता येतो याचा रास्त अभिमान पण त्याचं कुशलतेने पुरुषांच्या बरोबरीने सामाजिक दृष्टया त्यांना सन्मानाचे स्थान दिल्या जात नसेल तर मानवतेच्या दृष्टिकोणातुन आपण आजही वैचारिक मागास असण्याचं हे लक्षण आहे, या भूमिकेमध्ये आपणास बदल करावाचं लागेल, सामाजिक दृष्टिने विचार केला तर पुरुषांची मानसिकता बदलण्यास बराच अवधी लागेल, पण शिक्षित युवती, महीला,यांनी प्रथमतः स्वत:कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहीजे शिक्षित, उच्च शिक्षा उच्च पदस्थ झाल्यावरही स्त्री म्हणून पुरुषांनी वा समाजाने तुमच्या ने सहानुभूति ने वागले पाहीजे अशी धारणा असेल तर स्त्री पुरुष समानता हे दिवा स्वप्नचं ठरेल, महीलांना सवरक्षणार्थ कायदे आहेत ही जमेची बाजु आहे पण याच कायद्याचा दुरूपयोग काही महीला पुरुषांच्या आयुष्याचं मातेरं करतात आणि असं जेव्हा घडतं तेव्हा आपसुकचं सामाजिक दृष्टया महीलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो
महीला स्वता:च जर मी महीला आहे म्हणून कमजोर पडते, काही कामं करायला मला मर्यादा येतात असा विचाराधीन जगणारया असतील तर तुम्ही कितीही सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या तरी पुरुष वर्गाची बरोबरी त्या करु शकणार नाही व स्त्री पुरुष समानता हे तत्व येणाऱ्या पीढीकरीता कायमकुलम मृगजळ ठरलेलं असेल भविष्यात येणाऱ्या काळात खरोखर स्त्री पुरुष समानता तत्वाचं जे बिज काही दशकापासुन पेरल्या जात आहे त्याचं वटवृक्षात रुपांतरण होउन ते स्थिर झालं पाहीजे व स्त्री पुरुष समानतेच्या तत्वाचा अंगीकार करुण स्त्री पुरुष समन्वय चा नांगर या भारत भूमि त रुजवायला सुरुवात करायची असेल तर
महीलांनी आपली बलस्थानं ओळखली पाहीजे
महीलांनी स्वत:ला कमजोर न समजता बलशाली समजायला हवं एवढं बलशाली की स्त्री पुरुष समानता नव्हे तर मी पुरुषांपेक्षा कैकपटीने स्वयंभू आहे असा विचार फक्त मनात रुजवून तो आमलात आणायला हवा, आणि हे जडत्व अंगीकृत होत नसेल तर पुरुषांच्या पेक्षा मी किमान काकणभर सरस आहे , नव जन्म घेउन येणाऱ्या मुलीनां तु नाजुक नसून कणखर मजबूत व मुलापेक्षा प्रत्येक क्षेत्रात सरस आहेस असा विचार त्या बालमनावर बिंबवल्या गेले पाहीजे, तरचं येणाऱ्या काळातील पीढ़ी मध्ये ती खरया अर्थाने स्वयंभू बलशाली झालेली
आणि याची जबाबदारी वर्तमानात कौटुंबिक आयुष्य जगत असणाऱ्या व जगु पाहणारया प्रत्येक युवती ने समाज सुधारक, व तरुण पीढीने घेतली पाहीजे तरचं ही जगतजननी खरया अर्थाने स्वयंभू बलशाली झालेली असेल

ॲड पुजा प्रकाश एन.
०८/०३/२०२४

Previous articleआज 08 मार्च ला धावणारी आदिलाबाद-नांदेड इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द
Next articleश्रींच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी