Home Breaking News हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा

हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन’ , ‘ ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज ‘ यांच्या जन्मदिनी विद्यालयात जयंती साजरी करण्यात आली .

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य  प्रदीप सांगळे सर उपस्थितीत.विद्यालयाचे पर्यवेक्षक. संजय ताडगे सर, मराठी विषय शिक्षक श्री कापडी सर ,श्रीमती सानप मॅडम , भाबड सर, श्रीमती सोनवणे मॅडम, श्रीमती सीमा घुगे मॅडम, मराठी विभाग प्रमुख श्रीमती मासूळ मॅडम, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले . मराठी विषय शिक्षिका श्रीमती सानप मॅडम यांनी कविता गायन केले .मराठी विषय शिक्षिका श्रीमती रेखा धात्रक मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सांगळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख श्री. कापडी सर यांनी केले व आभार प्रदर्शन मराठी विभाग प्रमुख श्रीमती मासूळ मॅडम यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Previous articleप्रस्थापित राजकारण्यांचा डाव….!!
Next articleबंद केलेल्या तेरा घंटागाड्या त्वरित सुरू करुन खामगांवकरांच्या आरोग्याशी खेळणार्यां घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या मागणी करीता