Home Breaking News प्रगतशील शेतकरी सदानंद ढगे यांची सह्याद्री दुरदर्शन वाहीणीवर मुलाखत.

प्रगतशील शेतकरी सदानंद ढगे यांची सह्याद्री दुरदर्शन वाहीणीवर मुलाखत.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 27 फेब्रुवारी 2024

हिमायतनगर तालुक्यातील मौजे घारापुर येथील प्रगतिशील शेतकरी सदानंद ढगे सर यांनी गेल्या तीन ते चार वर्षांपासून कुक्कुटपालन व्यवसायात उतुंग भरारी घेत, महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने चिकन सेंटर, फळभाग लागवड, यांत्रिकीकरण आपल्या शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी स्वतः भेट दिली ढगे यांनी शेतकरी बचत गट स्थापन करुन कंपनी स्थापन करुन “पिकेल ते विकेल” योजनेच्या माध्यमातून स्वतःच्या शेतीसाठी पिकविलेला माल स्वतः विकत तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. याच बाबीची दखल घेऊन त्यांना विविध महाराष्ट्र शासन कृषि विभागा आणि पशुपालन दुग्धव्यवसाय विभागाच्या वतीने पुरस्कार मिळाले आहेत.
याच बाबीची दखल घेत दिनांक दुरदर्शन सह्याद्री वाहीणीवर ” आमची माती आमची माणसं” या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी मुलाखत झाली. त्या मुलाखतीचे प्रसारण आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:30 मिनिटांनी सह्याद्री दुरदर्शन वाहीणीवर प्रसारित होत आहे. तरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या मुलाखतीचा लाभ घ्यावा. असे त्यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले आहे.

Previous article*वीज कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर कामगार आयुक्त कार्यालयात बैठक, बेमुदत काम बंद आंदोलन अटळ, वीज कंपनी कडून आज कोणतेही ठोस आश्वासन नाही
Next articleप्रस्थापित राजकारण्यांचा डाव….!!