मारोतराव यलसटवार (सावकार) यांचे निधन….
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक- 10 मे 2022
👉 सवना ज गावांवर शोककळा,आज अंत्यविधी...
हिमायतनगर… तालुक्यातील सवना ज येथील सधन शेतकरी सर्वांच्या सुखदुःखात हिरीरीने सहभागी होणारे निष्ठावंत, आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सवना ज गावासह तालुक्यात प्रसिद्ध असणारे मारोतराव तानाजी यलसटवार वय(५१) यांचे अल्पशा आजाराने ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा रेणुकाई हॉस्पिटल नांदेड मध्ये उपचार चालू असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन मुली, तिनं बहिणी असा परिवार आहे.१० एप्रिल रोजी सकाळी ९ वा अंत्यविधी सवना गावातुन निघून त्यांच्या एकघरी शिवारातील शेतात १० वा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. माजी खासदार सुभाषराव वानखेडे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची गणना होती. सवना ज गावाच्या समस्या सोडवण्यासाठी निस्पृह भावनेने काम करण्यात त्यांचा हातखंडा होता. आजपर्यंत गावाचा जो काही विकास झाला.त्या विकासात मारोतराव यलसटवार (दाजी) यांचा मोलाचा वाटा होता.त्याच्या निधनामुळे सवना ज गावांवर शोककळा पसरली आहे.९ एप्रिल रोजी रात्रभर सवना गावातील नागरिकांच्या उपस्थितीत सवना ज,पार्डी ,एकघरी येथील भजनी मंडळांनी भजनाच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.