अभ्यासा बरोबर विद्यार्थांनी इतर कला-गुणांनाही वाव द्यावा पंढरीनाथ थोरे
हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर -8983319070
हिंदी माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन सिडको मधील रानेनगर शैक्षणिक संकुलात उत्साहात पार पडले यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा पंढरीनाथ थोरे साहेब होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितलं की फक्त अभ्यास करूनच करियर करता येते असे नाही तर इतर कला व क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करून योग्य करियर करता येते हे क्रिकेटपट्रू सचिन तेंडुलकर याच उदाहरण देवून सांगितलं त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी विद्यालयातील इतर स्पर्धात्मक कला क्रीडा प्रकारात सहभागी व्हावे.यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त भास्करराव सोनवणे यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा आपल्या भाषणातून घेतला व येथे काही भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात याबाबत अध्यक्ष यांना अवगत करून दिले तसेच येथील प्राचार्य व शिक्षकांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.यावेळी विश्वस्त दामोदर आण्णा मानकर यांनीही आपले विचार व्यक्त केले
सुरवातीला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन व माता सरवस्ती आणि क्रां वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य प्रदिप सांगळे यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळविलेल्या नैपुण्य बद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व मेडल तसेच विविध बक्षिसे देवून सत्कार करण्यात आला.
त्यानंतर विविध गुण दर्शनाच्या कार्यक्रमापूर्वी रंगमंचाचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे साहेब व इतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कला गुणांचे प्रदर्शन केले यावेळी नृत्यगीते,समूहगीत,देशभक्ती पर गीते,लावणी नृत्य,वैयक्तिक गीते,भोजपुरी गीते,एकपात्री प्रयोग व विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्य आविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली लहान मुलांच्या अंगी असलेल्या या कला गुणांची अनेक मान्यवरांनी व प्रेक्षकांनी कदर करून त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले.
याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त आदरणीय सुभाषराव कराड,संचालक विठोबाराजे फडे,विलासराव आव्हाड,सुरेशराव घुगे,तुळशीराम विंचू,विष्णुपंत नागरे,विजय बुरकुल संचालिका शोभाताई बोडके मनपा प्रशासनाधिकारी बी टी पाटील शिक्षणाधिकारी मोहन चकोर,,प्राचार्य डॉ राजेंद्र सांगळे, भाजपचे नेते प्रकाश चकोर,विखे पाटील बँकेचे संचालक माणिकराव जायभावे,सामाजिक कार्यकर्ते के के सानप, तुकाराम सोनवणे उत्तर भारतीय सामाजिक कार्यकर्ते पवन जोशी,अतुलजी पांडे,भरोसी यादव, व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता
माध्यमिक रानेनगरचे मुख्याध्यापक विलास सांगळे, मुख्याध्यापिका सुनंदा नागरे, बिंदुलता यादव, मॅडम पर्यवेक्षक संजय ताडगे, अदी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन के पी कापडी व श्रीमती गीता बागुल यांनी केले आभार प्रदर्शन काळे एस के, यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .