@ राजकीय वार्तापत्र @
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 12 फेब्रुवारी 2024
….. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक मेनेजमेंन्ट गुरु म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा. खासदार, काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशी विविध पदे भुषवित महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात एक वेगळा दबदबा निर्माण करणारा लोकप्रिय नेते… अशोकराव चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्र काॅग्रेस सदस्य पदाचा आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे महाराष्ट्रांतील राजकारणात वेगळीच खळबळ उडाली आहे.
….पण हे कधी..ना..कधी असे होणारच होते…कारण शिंदे- फडणवीस सरकारने विधानसभेत आमदार महोदयाचे मतदान घेतले… त्यावेळी हेच अशोकराव चव्हाण साहेब आणि त्यांचे निकटवर्तीय आमदार त्या बहुमत चाचणीला अनुपस्थित होते. खरं तर तेंव्हाच हा भुकंप होणार आहे. अशाही बातम्याही प्रसार माध्यमांत चालत होत्या. परंतु ते तसे नव्हतेच जे होते ते आजच होते……शेवटी हेच म्हणावेच लागेल महाराष्ट्राच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधुन अशोकपर्व संपले…..