जिल्हा संपादक नांदेड दिनांक -23 जानेवारी 2024
नांदेड जिल्ह्यात पोलिस पाटील या पदासाठी लेखी परीक्षा नांदेड येथे घेण्यात आली. त्यांचे गुण संबंधित उमेदवार यांना मीळाले आहेत. परंतु त्यानंतर दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी उपविभागीय अधिकारी हदगांव येथे एका जागेसाठी पाच पात्र उमेदवारांची तोंडी मुलाखत घेण्यात आली. परंतु अद्याप त्यांचे गुण उमेदवारास मिळाले नाहीत. त्वरित तोंडी मुलाखतीचे गुण त्वरित जाहीर करावेत. अशी मागणी तोंडी पात्र उमेदवारांनी केली आहे.
👉पोलिस पाटील भरती प्रक्रियेत घोटाळा.
👉मा. खासदार सुभाष वानखेडे यांचा निवड समितीवर आरोप.
नांदेड जिल्ह्यात पोलिस पाटील स्पर्धा परीक्षेत भरती प्रक्रियेत ज्या उमेदवारांना लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तोंडी मुलाखतीसाठी पात्र ठरविले होते. त्यांच्या मुलाखतीमध्ये लाखो रुपयाची उलाढाल झाल्याचा आरोप माजी खासदार सुभाष वानखेडे साहेब यांनी केला आहे. लेखीत पास परंतु तोंडीं परीक्षेत नापास….असा आरोप माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी जिल्हा निवड समिती वर केला आहे.